मेक इन इंडियाअंतर्गत उडत्या कार, ई नोजही बनणार

flying-car
तंत्रक्षेत्रात क्रांती घडवून आणण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या पुढाकाराने सुरू झालेल्या मेक इन इंडिया योजनेत उडत्या कारपासून ते ई नाक, जीभ अशा सर्व उत्पादनांचे उत्पादन भारतात केले जावे असा सल्ला थिंक टँक म्हणून कार्यरत असणार्‍या टीआयएफएसी ने पंतप्रधान मोदींना दिला आहे. मैसूर येथे नुकत्याच पार पडलेल्या १०३ व्या इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये टेक्नॉलॉजी व्हीजन २०३५साठीचा रोडमॅप या थिंक टँकतर्फे सादर केला गेला त्यात हे नमूद केले गेले आहे.

या रोडमॅपमध्ये तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती घडवायची असेल तर १२ विविध सेक्टर्सच्या विस्ताराची गरज नमूद केली गेली आहे. अनेक प्रकल्पांचा पथदर्शी पातळीवरच विस्तार आवश्यक आहे तर कांही ठिकाणी संशोधन विकासावर जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. भविष्यातील तंत्रज्ञान क्रांती लक्षात घेता भारतात उडत्या कार, रियल टाईम ट्रान्सलेशन सॉफ्टवेअर, पर्सनलाईज्ड मेडिसिन, वेअरेबल डिव्हायसेस, ई सेन्सिंग- ई नाक, जीभ तसेच १०० टक्के रिसायकलेबल पदार्थ हे रोजच्या आयुष्यातील समस्यांवर उपाय म्हणून वापरात येतील असे या थिक टँकचे म्हणणे आहे.

Leave a Comment