रिटेल सेक्टरची ‘रिटेल मॅनेजमेंट प्रोग्राम’सोबत करा निवड

retail
शिक्षण क्षेत्रात रिटेल मॅनेजमेंट हे एक तरुणांसाठी नवे आणि हटके करिअर ऑप्शन बनत आहे. त्यामुळे बऱ्याच कॉलेजातही या अभ्यासक्रमाचा समावेश करण्यास सुरुवात झाली आहे.

देशाची वाढती लोकसंख्या पाहता बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांची वाढती संख्या एक समस्या बनत चालली आहे. सरकारी नोकरी म्हणजे तर लॉटरी लागण्याइतकी अवघड होऊन बसली आहे.

रिटेल मॅनेजमेंट सेक्टर हे नव्याने उदयास आलेले क्षेत्र आहे. रिटेल सेक्टरमध्ये अल्पकाळातच दहा लाखांहून अधिक नोकरीच्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

रिटेल क्षेत्रामध्ये वाढत्या रोजगाराची शक्यता पाहता आयआयटीजेटी ( इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ जॉब ओरिएंट ट्रेनिंग ) ने रिटेल मॅनेजमेंटमध्ये एक अभ्यासक्रम सुरु केला आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी १२ महिन्याचा असून, यामध्ये सप्लाय चेन, रिटेल फायनांस आणि सॉफ्ट स्किल्स आणि सेटोर ऑपरेशनचे कन्सेप्ट,रिटेल स्टोर ऑपरेशन, रिटेल सेलिंग स्किल्स, कंझ्यूमर बाईंग बिहेविअर, फ्रेंचाइजिंग, रिटेल लॉ, बाइंग अॅण्ड मर्चेंडाइजिंग आणि इंटरनॅशनल रिटेल अॅण्ड रिटेल स्ट्रॅटेजी यासारखे विषय शिकवले जातात. प्रवेश घेण्यासाठी किमान ६० टक्क्यांसह १२ वी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. अभ्यासक्रमाचे वार्षिक शुल्क सुमारे ३५,००० रुपये आहे.

हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर मार्केटींग, अकाउंट, फायनान्स, स्टोर ऑपरेशन आणि प्रोडक्ट/ब्रँड मॅनेजमेंट सारख्या क्षेत्रात नोकरीच्या संधी मिळतात.

शिक्षणक्षेत्रात रिटेल मॅनेजमेंट हे एक तरुणांसाठी नवे आणि हटके करिअर ऑप्शन बनत आहे. त्यामुळे बऱ्याच महाविद्यालयांनी या अभ्यासक्रमाचा समावेश करण्यास सुरुवात केली आहे.

Leave a Comment