भारताला मिळणार चिनी सागरात नवे ठिकाण

chin
नवी दिल्ली – भारताला लवकरच दक्षिण चिनी सागरी क्षेत्रात रणनीतिक ठिकाण मिळू शकणार आहे. लवकरच भारताला व्हिएतनामस्थित नवे सॅटेलाइट मॉनिटरिंग स्टेशन सुरू होण्याची शक्यता आहे आणि हे शेजारी देश इंडोनेशियात असणा-या आणखी एका अशाच केंदाशी संलग्न असेल. या क्षेत्रात चीन आपला दबदबा वाढविण्याच्या प्रयत्नात आहे.

दक्षिण व्हिएतनामचे शहर हो ची मिन मध्ये भारताने स्टेट ऑफ द आर्ट रिसेप्शन अँड ट्रकिंग अँड टेलिमेट्री स्टेशन स्थापन केले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) लवकरच हे केंद्र सुरू करून इंडोनेशियाच्या बियाक स्थित केंद्राशी लिंक करेल, अशी माहिती एका अधिका-याने दिली.

हो ची मिन शहरातील या अंतराळ केंद्राद्वारे इस्रोला भारतातून प्रक्षेपित करण्यात आलेल्या उपग्रहांवर नजर ठेवण्यास आणि यातून माहिती प्राप्त करण्यास मदत मिळेल. भारताचे ब्रुनेईत देखील सॅटेलाइट ट्रकिंग स्थानक आहे. भारत सरकारने हो ची मिन शहराच्या या नव्या केंद्रावर जवळपास २.३ कोटी डॉलर्स खर्च केले आहेत.

दक्षिण चिनी सागरात भारतासाठी हे केंद्र महत्त्वाचे रणनीतिक केंद्र असेल. मागील काही वर्षांमध्ये या क्षेत्रात चीनचे व्हिएतनाम आणि फिलीपाइन्स सारख्या देशांसोबत संबंध तणावापूर्ण राहिले आहेत. भारत, अमेरिका आणि जपान या देशांनी दक्षिण चिनी सागरी क्षेत्रात चीनच्या आक्रमक भूमिकेबाबत चिंता व्यक्त केली आहे. हे क्षेत्र जागतिक व्यापारासाठी महत्त्वपूर्ण मार्गाचा भाग आहे.

Leave a Comment