आबीद नीमचवाला विप्रोचे नवीन सीईओ

wipro
नवी दिल्ली – वरिष्ठ व्यवस्थापनामध्ये देशातील मोठी आयटी कंपनी असलेल्या विप्रोने मोठा बदल केला आहे. टीसीएस कंपनीमध्ये ग्लोबल बिझनेस प्रोसेस सेवेचे प्रमुख असणा-या आबीद यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून विप्रोमध्ये निवड केली आहे. आबीद अली विप्रोच्या सीईओ पदाचा कार्यभार १ फेब्रुवारीपासून स्वीकारणार आहेत. सध्या विप्रोचे सीईओ टी. के कुरियन आहेत. त्यांना कंपनीने एक्झिक्युटिव्ह व्हाइस चेअरमनपदी बढती दिली आहे.

Leave a Comment