शुद्ध पाण्यातही जिवाणूंचे अस्तित्व – ब्रिटिश संशोधक

water
लंडन : पिण्याच्या पाण्यात असलेले जिवाणू म्हणजेच बॅक्टेरिया शरीरासाठी अपायकारक असल्याचे आपल्याला माहीत आहे. त्यामुळे हे जिवाणू नष्ट करून पाणी शुद्ध करण्याचा आपला प्रयत्न असतो. पण पाण्यामध्ये असणारे काही जिवाणू शरीरासाठी अपायकारक नव्हे, तर उपयुक्त असतात, असा दावा ब्रिटिश संशोधकांनी केला आहे.

१० दशलक्ष जिवाणू एक ग्लासभर शुद्ध पाण्यात असतात, जे आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात. हे जिवाणू पाणी शुद्धीकरण करत असतात, असे या संशोधकांनी सांगितले. पाण्याच्या शुद्धीकरण प्रक्रियेनंतर या संशोधकांना कोट्यावधी जिवाणू पिण्याचे पाणी पुरवणा-या वाहिन्या आणि जल शुद्धीकरण प्रकल्पांमध्ये आढळून आले. मात्र हे जिवाणू उपयुक्त असल्याचेही त्यांना आढळले. प्रत्येक जिवाणू उपद्रवी असतात असे नाही, तर काही जिवाणू निरुपद्रवी असून पाणी शुद्ध करण्यात त्यांचाही मोठा वाटा असतो, असे या संशोधकांनी सांगितले.

पिण्याच्या पाण्यातील जिवाणूंची व सूक्ष्मकणाची निर्मिती ही जल शुद्धीकरणाच्या प्रकल्पातून आणि पाण्याच्या पुरवठा करणा-या वाहिन्यांच्या आतील भागात जाड, चिकट आवरणातील बायोफिल्ममध्ये आढळून येते. पाण्याचे सर्वसाधारण पाणवठे बायोफिल्मच्या याच आच्छादनाखाली असतात. या संशोधनानुसार पाण्याच्या वाहिन्यांमध्ये प्रचंड प्रमाणात जिवाणू असतात. दुसरीकडे संशोधकांना अशी ही शंका व्यक्त केली आहे की, पाण्याच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया ही जलशुद्धीकरण प्रकल्पापेक्षा पाणी पुरवणा-या वाहिन्यांमध्येच मोठ्या प्रभावीपणे होत असते. पर्यावरणातील हा अनोखा गुणधर्म निश्चितच आपल्यासाठी नावीन्यपूर्ण आहे.

पण सध्याच्या भरीव अशा डीएनए तंत्रज्ञानातील परिणितीमुळे एक लिटर पिण्याच्या पाण्यातील आठ हजार बॅक्टेरियांचा शोध लावण्याची किमया सहज शक्य असल्याचे मत स्वीडनच्या लॉण्ड विद्यापीठाचे कॅथेरिन पॉल यांनी व्यक्त केले आहे. अभ्यासकांच्या मते, जिवाणूंमुळे पाण्याच्या गुणवत्तेमध्ये फरक पडत असतो. त्यामुळेच पाण्याच्या शुद्धीकरणात काही जिवाणू महत्त्वाचे योगदान देतात, असे पॉल म्हणाले.

Leave a Comment