या जोडप्याने अवघ्या २०० रुपयांमुळे गमावले ३४४ कोटी रुपये

couple
लिसेस्टर : जर तुम्हाला तब्बल ३४४ कोटी रुपयांची लॉटरी लागली आणि ही रक्कम तुम्हाला मिळाली नाहीतर तुम्हाला कसे वाटेल. पण असेच काही डेविड आणि एडविना नायलन या जोडप्यांसोबत घडले आहे.

अवघ्या २०० रुपयांमुळे ब्रिटनमधील या जोडप्याला तब्बल ३४४ कोटी रुपये गमवावे लागले आहेत. लॉटरीद्वारे लिसेस्टर यांना ३४४ कोटींचे बक्षीस लागले होते. जेव्हा त्यांना लॉटरी लागल्याचे समजले तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. मात्र वेबसाईटवर याबाबत अधिक माहिती मिळवली असता त्यांना समजले की त्या ही रक्कम घेऊ शकत नाहीत. जेव्हा या दाम्पत्याने लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते तेव्हा त्यांच्या बँक खात्यात पुरेशी शिल्लक नसल्यामुळे या रकमेचा व्यवहार होऊ शकला नाही. लॉटरी खरेदी करताना यांच्या अकाउंटमध्ये २०० रुपये नव्हते.

१, २, ४, १९, २८, ४१ नंबरचे लॉटरीचे तिकीट डेविडने ऑनलाइन घेतले होते. मात्र नायलन यांच्या अकाउंटमध्ये ६० पेनी होती. नायलन यांनी लगेचच टॉप-अप केले आणि पुन्हा तिकीट खरेदी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर तो नंबर मिळाला नाही आणि याच नंबरच्या लॉटरीचे तिकीट लागले.

Leave a Comment