आता सरकारी नोकरीसाठी मुलाखत नाही

interview
नवी दिल्ली : सरकारी नोकऱ्यांमध्ये भरतीसाठी मुलाखत घेण्याची प्रक्रिया नव्या वर्षात बंद केली जाणार असून सी आणि डी वर्गातील सरकारी नोकऱ्यांसाठी एक जानेवारीपासून मुलाखत देण्याची तसेच प्रतित्रापत्र सादर करण्याची गरज नाही. मुलाखती शिवायही तुम्ही नोकरी मिळवू शकता.

याचा ग्रामीण भागातील युवकांना सरकारच्या या निर्णयामुळे मोठा लाभ होणार आहे. त्यांना आपल्या दस्तावेजांची अनेकदा पडताळणी करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यामुळे काही पदांवरील नोकरीकरिता प्रतिज्ञापत्र सादर कऱण्यास सूट दिली आहे.

सरकारी नोकऱ्यांसाठी मुलाखत होणार नसल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर या नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. आम्ही हा निर्णय घेतला असून पुढील वर्षी एक जानेवारीपासून सी आणि डी वर्गातील नोकऱ्यांसाठी मुलाखत होणार नसल्याचे केंद्रीय राज्य मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले आहे.

1 thought on “आता सरकारी नोकरीसाठी मुलाखत नाही”

Leave a Comment