सॅमसंगचा ए नाईन स्मार्टफोन लाँच

samsung
सॅमसंगने त्यांच्या ए सिरीजमधील नवीन स्मार्टफोन ए नाईन नावाने चिनी इव्हेंटमध्ये सादर केला आहे. या फोनच्या किमती अथवा तो बाजारात विक्रीसाठी कधी येणार याची माहिती अद्याप दिली गेलेली नाही. या फोनचे खास आकर्षण आहे ती त्याची ०.३ इंची शानदार अॅल्युमिनियम फ्रेम. मात्र त्यामुळे हा फोन सहजी खिशात मावणार नाही.

या फोनसाठी ६ इंची सुपर अमोलेड स्क्रीन कर्व्ह ग्लाससह दिला गेला आहे. ३ जीबी रॅम, इंटरनल मेमरी ३२ जीबी ती मायक्रो कार्डच्या सहाय्याने १२८ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा आहे. १३ एमपीचा रियर कॅमेरा एलईडी फ्लॅशसह असून ८ एमपीचा फ्रंट कॅमेरा वाईड सेल्फी मोड, सेल्फ पोट्रेट मोड व पाम सेल्फी मोड या फिचर्स सह दिला गेला आहे. सॅमसंग पे सपोर्टसह फोन असून तो अड्राईड ५.१.१ ओएसवर काम करेल. फोनला ४ हजार एमएएच बॅटरी आहे व तरीही हा फोन बर्‍यापैकी सडपातळ आहे.यात होमबटण वरच फिंगरप्रिंट सेन्सर दिला गेला आहे.

Leave a Comment