जम्मू काश्मीरमधला पहिला मोठा केबल ब्रिज खुला

atal
पंजाबला जम्मू आणि हिमाचलशी जोडणार्‍या पहिल्या मोठ्या केबल ब्रिजचे उद्घाटन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या हस्ते करण्यात आले असून अटल सेतू या नावाने बांधला गेलेला हा पूल रावी नदीवर बांधला गेला आहे. देशातील हा चार नंबरचा मोठा केबल ब्रिज आहे. उद्घाटन कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री जितेंद्रसिंग तसेच आर्मी चीफ दलबीरसिंग सुहाग उपस्थित होते. हा पूल दुनेरा, बसहोली, भद्रवाह रोडला जोडला गेला आहे. यामुळे या दुर्गम भागात पर्यटनासाठी जाणार्‍याची मोठीच सोय होणार आहे.

हा पूल बॉर्डर रोड ऑरगनायझेशनने बांधला असून त्यासाठी कॅनडा, जपान, स्पेन व स्वित्झर्लंडमधील अभियंत्यांचे सहकार्य मिळाले आहे. ५९२ मीटर लांबीच्या या पुलाला ३५० मीटर लांबीच्या नदी पात्रात एकही पिलर नाही. दोन्ही काठावर ९० फुटी टॉवर उभारले गेले आहेत. हे बांधकाम चार वर्षे सुरू होते व त्यासाठी १४५ कोटी रूपर्य खर्च आला आहे. शिवालिक पर्वतरांगात पसरलेल्या ८८ चौरस किमीच्या विशाल रंजीतसागर बांध, माता चंचलोदेवी, सुमनघाट, धार महानपूर, जौडीया माता, तीर्थस्थळ या प्राचीन ठिकाणी पर्यटनासाठी जाणार्‍यांना या पुलामुळे मोठी सुविधा मिळाली आहे व प्रवासाचे अंतरही कमी झाले आहे.

Leave a Comment