रिलायन्स देणार सर्वात स्वस्त इंटरनेट

rilaence
मुंबई: मोबाईलद्वारे इंटरनेट वापरणाऱ्या नेटीझन्ससाठी रिलायन्सने खूशखबर दिली आहे. रिलायन्स जिओ २८ डिसेंबरपासून आपली ४ जी सेवा सुरु करत आहे. रिलायन्स जिओ देशात सर्वात स्वस्त ४ जी इंटरनेट सेवा देणार असून एअरटेल व वोडाफोन या स्पर्धक कंपन्यांपेक्षा रिलायन्स ६० टक्के कमी दरात ४ जी इंटरनेट डेटा प्लान देणार आहे.

रिलायन्स जियो आपल्या ग्राहकांना १० जीबी इंटरनेट डेटा ५९९ रुपयांत उपलब्ध करून देणार आहे. एअरटेल इतक्याच डेटासाठी १३५० रूपये तर वोडाफोन १५०० रुपये आकारत आहे.

रिलायन्स जिओची ४ जी सेवा सुरुवातील २१ पैकी ५ टेलिकॉम सर्कल्समध्ये सुरु होणार आहे. यात तिन्ही ब्रँड्‍स उपलब्ध असतील. मुंबई, मध्य प्रदेश, इशान्य भारत, आसाम व ओडिशाचा समावेश आहे.

Leave a Comment