सोने मागणी कमी झाल्याने २५ हजाराखाली

gold
मुंबई – सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या दरामध्ये घसरण झाल्याने सोने २५ हजाराच्या खाली गेले आहे. सोने दरात शुक्रवारी २१५ रुपयांनी घसरण झाल्याने सोने २४९३५ प्रति १० ग्रॅमवर आले आहे. देशांतर्गत बाजारामध्ये सराफी बाजारातून आणि ग्राहकांकडून मागणी कमी झाल्याने आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कॉमेक्सवर सोने २ टक्क्यांनी घसरण झाल्याने सोने दरात मोठी घसरण झाली आहे. तसेच चांदीही उद्योग क्षेत्रातून मागणी घटल्याने ६५० रुपयांनी कमी होऊन ३३ हजार ५२० प्रति किलोवर गेली आहे. येणा-या दिवसांमध्येही सोने, चांदी दरात घसरण होण्याची शक्यता असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.

Leave a Comment