फेब्रुवारीत मेक इन इंडिया सप्ताह

make
मुंबई – फेब्रुवारीच्या १३ ते १८ तारखेदरम्यान मुंबईत मेक इन इंडिया सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून त्यात ६० देशांतून १ हजारावर कंपन्या सहभागी होण्याचे संकेत दिले गेले आहेत. सप्ताहाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. इनोव्हेशन, डिझाईन आणि सस्टेनेबिलीटी ही या सप्ताहाची थीम आहे.

वाणिज्य व उद्योग मंत्रालयाचे सचिव अमिताभ कांत यांनी दिलेल्या माहितीनुसार विदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करणे हा या सप्ताहाचा मुख्य हेतू आहे. गेल्या १७ महिन्यात एफडीआय मधील गुंतवणूक गतवेळच्या याच काळापेक्षा ३५ ट्कके अधिक झाली आहे. इलेक्ट्राॅनिक्स, ऑटोमोबिल, खाद्यान्न प्रक्रिया, टेक्स्टाईल, गार्मेंट, रिन्यूएबल एनर्जी यांत चांगली गुंतवणूक झाली आहे. भारतात व्यवसाय करणे सहजसुलभ करणे हेच आमच्यासमोरचे मोठे आव्हान असून त्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत.

Leave a Comment