तेल निर्यातीवरील बंदी अमेरिकेने उठवली

america
वॉशिंग्टन : जगातील महासत्ता अमेरिका आता तेलही विकणार असून अमेरिकेने गेल्या ४० वर्षापासून तेल निर्यातीवरील बंदी उठवल्यामुळे याचा फायदा भारतासारख्या देशांना होणार आहे.

या निर्णयाला अमेरिकन कॉँग्रेसने मंजुरी दिली असून गेल्या ४० वर्षांपासून तेल निर्यातीवर असलेली बंदी उठवली आहे. यामुळे अमेरिकेतील ऊर्जा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होऊ शकेल. हा आमच्या परराष्ट्र धोरणाचा मोठा विजय आहे, असे अमेरिकन सिनेटचे अध्यक्ष पॉल रायन यांनी सांगितले. १९७५ मध्ये इंधन तुटवडा निर्माण झाल्याने तेल निर्यातीला बंदी घातली होती. गेले काही वर्षे तेल क्षेत्रात काम नसल्याने ८० हजार नोक-या निर्माण झाल्या. आता नवीन धोरणामुळे १० लाख नोक-या निर्माण होऊ शकतील. तसेच अमेरिकेला १७० अब्ज डॉलर्स मिळू शकतील, असे रायन म्हणाले. अमेरिकेत रोज अब्जावधी पिंप तेल निर्मिती होत आहे. यामुळे जागतिक स्तरावर मोठी स्पर्धात्मकता निर्माण होईल. याचा फायदा ग्राहकांना फायदा होईल. तसेच गॅसच्या किमती मोठ्या प्रमाणावर घसरतील, असे त्यांनी सांगितले. या निर्णयामुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. तसेच आमच्या मित्र देशांना त्याचा मोठा फायदा मिळेल.

Leave a Comment