आता तुम्ही बोला कलाकारांच्या आवाजात

yedub
नवी दिल्ली : बॉलीवूडचा तुमचा एखादा आवडता कलाकार त्याच्या आवाजात तुमचा डायलॉगमध्ये बोलत असेल तर खूप आनंद होईल ना? ‘येडब’ अॅप ही आपली इच्छा मोबाईल पूर्ण करणार आहे. येडब हे पहिले अॅप आहे, ज्याच्या माध्यमातून बॉलिवूड कलाकार वापरकर्त्यांना आपला आवाज देत आहेत.

विशेष संवादाची येडबमध्ये लायब्ररी असून प्रेम, रोमँटिक, पार्टी, डेली ड्रामा, फिल्मी यांच्यासह मराठी, तेलगू, पंजाबी डायलॉग यामध्ये आहेत. हे डायलॉग अमिताभ बच्चन, सलमान खान, शाहरुख खान, रणबीर कपूर, अनिल कपूर, सनी लियॉन यांच्यासह अनेक बॉलिवूड कलाकारांचे आहेत. या स्टार्सच्या आवाजात आपण आपले डायलॉग डब करू शकता.

आपण या डायलॉग्सवर सेल्फी व्हिडिओ तयार करून आपल्या मित्रांना फेसबुक, ट्विटर, व्हॉट्स ऍपसह सर्व सोशल साइटवर शेअर करू शकता. येडब अॅप भारतासह विदेशात फ्रेंच, चीन आणि जपानीसह अनेक विदेशी भाषांमध्ये उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. येडब हे अॅप गुगल प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध आहे.

Leave a Comment