ब्राझीलमध्ये व्हॉट्सअॅपचे ४८ तास शट डाऊन

whatsapp
नवी दिल्ली : मेसेजिंग अॅप्लिकेशनचे अॅक्सेस ब्राझीलमध्ये बंद करण्यात आले आहे. ही सर्व्हिस गुरुवारी सकाळी बंद करण्याचे आदेश न्यायाधीशांकडून सर्व लोकल फोन कंपन्यांना देण्यात आले असून हे आदेश एका सुनावणीदरम्यान देण्यात आले आहेत.

याबाबत ब्राझीलच्या सिंदी टेलीब्राझील या फोन कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅप टेक्स्ट मेसेज आणि स्मार्टफोन्ससाठी इंटरनेट व्हॉईस टेलिफोन सर्व्हिस बंद करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या कम्युनिकेशन टूल व्हॉट्सअॅपचे अॅक्सेस ब्लॉक करण्याच्या निर्णयाने आम्ही निराश झालो आहोत. अनेक यूजर्स व्हॉट्सअॅपवर अवलंबून असल्याचे असे व्हॉट्सअॅपचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅन काऊमने सांगितले. याबाबत पोस्ट करुन फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्गनेही निराशा व्यक्त केली.

Leave a Comment