२१ मेगापिक्सल कॅमेरा असलेला यू यूटोपिया लाँच

yotophia
मुंबई – यू युरेका, यू युरेका प्लस, यू युनिक, यू युफोरिया असे स्वस्त स्मार्टफोन देणाऱ्या भारतीय मोबाईल कंपनी मायक्रमॅक्सने खास भारतीय युवावर्गाला आकर्षित करण्यासाठी सुरू केलेल्या यू टेलिवेंचर्स या नव्या कंपनीच्या माध्यमातून आपला आधीचा लौकिक कायम ठेवत याच मालिकेत आता यू युटोपिया हा आजवरचा सर्वात दणकट फीचर्स असलेला स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत सादर केला आहे.

फक्त अमेझॉन या ऑनलाईन शॉपिंग साईटवरच हा स्मार्टफोन उपलब्ध असून आज दुपारी दोन वाजल्यापासून यू युटोपियाच्या विक्रीपूर्व नोंदणीला सुरूवात झाली आहे. तर प्रत्यक्ष डिलीव्हरीसाठी २६ डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. यू युटोपियाची किंमत रू. २४,९९९ एवढी आहे.

हा फोन गूगलच्या अँड्राईड ५.१.१ लॉलिपॉपवर आधारित सायनोजेनमोड ओएसवर चालतो. त्याचबरोबर ४जी साठी सक्षम असलेल्या या फोनची स्क्रीन ५.२ इंच मोठी असून यू युटोपियाच्या स्क्रीनचे १४४०×२५६० पिक्सेल एवढे रेझोल्यूशन क्यूएचडीचा आहे. तसेच याचा इन्डेक्स पिक्सेल पर इंच ५६५ आहे. याचा प्रोसेसर स्नॅपड्रॅगन ८१० प्रोसेसर यू युटोपियामध्ये असून फोनची बांधणी ६४ बीटवर करण्यात आली आहे. तसेच या स्मार्टफोनची रॅम ४जीबी असून इनबिल्ट मेमरी ३२GB आहे. तसेच एक्सटर्नल मेमरी कार्डच्या सहाय्याने मेमरी ६४जीबी पर्यंत वाढवताही येऊ शकते.

यू युटोपियामध्ये वैशिष्ट्य म्हणजे यात २१ मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा असून त्याने ४के दर्जाचा व्हिडिओ शूट करता येऊ शकतो. यू युटोपियामध्ये ८ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला असून या स्मार्टफोनची संपूर्ण बॉडी हे मेटलची आहे. फिंगरप्रिंट स्कॅनरची सुविधादेखील यू युटोपियामध्ये देण्यात आली आहे. त्याशिवाय सुपरफास्ट चार्जिंगची सुविधा असलेली तब्बल ३०००mAh बॅटरी या स्मार्टफोनमध्ये आहे.

Leave a Comment