जस्टिन बिबरसोबतचा सारा तेंडुलकरचा फोटो व्हायरल!

sara
मुंबई : पॉप सिंगर जस्टिन बिबरसोबतचा सचिन तेंडुलकरच्या मुलीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सचिन तेंडुलकरचे जगभरात लाखो चाहते असताना, त्याची मुलगी सारा ही टीनएजर्सच्या गळ्यातील ताईत असलेल्या जस्टिन बिबरची चाहती आहे.

जस्टिन बिबरसोबतचा १८वर्षीय सारा तेंडुलकरचा फोटो एका मासिकामध्ये प्रकाशित झाला होता. जस्टिनला भेटल्याचा आनंद साराच्या चेहऱ्यावरुन अगदी ओसंडून वाहत आहे आणि तोच फोटो आता व्हायरल झाला आहे. काही दिवसांपूर्वीच सारा तेंडुलकर शाहिद कपूरसोबत बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा रंगली होती. पण माझी मुलगी सध्या तिच्या शिक्षणावर लक्ष केंद्रीत करत असून ती चित्रपटात काम करणार असल्याच्या अफवांनी त्रासल्याचे म्हणत सचिनने ही चर्चा चुकीचे असल्याचे सांगितले.

Leave a Comment