सोने झाले २५,६९० रुपये प्रति तोळा

gold
नवी दिल्ली : सोने उठाव जागतिक बाजारपेठेतील मंदी आणि नकारात्मक संकेत मिळाल्यानंतर कमी झाल्यामुळे आणि मागणीतही घट झाल्याने सोन्याच्या किंमतीत घसरण पाहायला मिळत असून सलग दुसऱ्या दिवशीही सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.

सोन्याच्या दरात मंगळवारी १६० रुपयांनी घट झाली असून आज सोने २५,६९० रुपये प्रति १० ग्रॅम असा, तर चांदीचा भाव २०० रुपयांनी घटून ३३,५०० रुपये किलो दर झाला आहे.

याबाबत सराफा व्यापाऱ्यांनी सांगितले की, जागतिक बाजारात मागणीत घट झाली आहे. तसेच जागतिक सोने व्यापाऱ्यांचा दबाव वाढत आहे. जागतिक मार्केटमधील न्यूयॉर्कमध्ये सोमवारी सोने १.३१ टक्के घसरुन १,०६०.१० डॉलर प्रति औंस आणि चांदीचा भाव १.७३ टक्के घसरुन १३.६५ डॉलर प्रति औंस झाले. तसेच लग्नसराईचा आठवडा संपल्याने दागिणे बनविणे थांबल्यामुळे सोने दरात घसरण झाल्याची दिसून येत आहे.

Leave a Comment