अवघ्या २२ हजारात ४५ हजाराचा आयफोन ५एस

iphone
मुंबई : अॅपलने आयफोन खरेदी करणाऱ्या आपल्या मोबाईलच्या चाहत्यांसाठी भन्नाट बातमी दिली असून अॅपलने आपल्या आयफोन ५एसच्या किमतीत भरघोस कपात करण्यात आली असून आता निम्म्या किमतीत आयफोन ५एस मिळणार आहे.

आता आयफोन ५एसची भारतीय बाजारात किंमत २२ हजार ३०० पर्यंत खाली आली आहे. सप्टेंबर महिन्यात हीच किंमत ४४ हजार ५०० पर्यंत होती. त्यामुळे आयफोन ५एसच्या प्रेमात असलेल्या ग्राहकांना हा फोन आता निम्म्या किमतीत मिळणार आहे. आयफोन ५एस अॅपलचा भारतातील बेस्ट सेलर फोन आहे.

आयफोनला भारतीय बाजारपेठेत चांगली मागणी येत होती. पण आयफोन ६एस आणि ६एस प्लसच्या मागणीत दिवाळीनंतर घट झाल्यामुळेच कंपनीने विक्री वाढवण्यासाठी आयफोन ५एसची किंमत कमी करण्याचा निर्णय घेतला. या मोबाईलची किंमत भारतात निम्म्यावर आली असली, तरी अन्य देशात ती यापेक्षा खाली आली आहे.

Leave a Comment