गुगलचे सीईओ सुंदर पिचाई उतरले मुस्लिमांच्या समर्थनासाठी

sundar-pichai
कॅलिफोर्निया: सध्या मुस्लिमांवरुन अमेरिकेत जोरदार राजकारण सुरु असून अमेरिकेत राष्ट्रपती पदाचे उमेदवार ट्रम्प डोनाल्ड यांनी अमेरिकेत मुस्लिमांवर बंदी घालायला हवी असे वक्तव्य नुकतेच केले होले. ट्रम्प यांच्यावर त्यानंतर चोहोबाजूंनी टीकेची झोड उठली होती. फेसबुक संस्थापक मार्क झुकरबर्गनेही त्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेतला होता. झुकरबर्ग पाठोपाठ आता भारतीय वंशाचे गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी देखील मुस्लिमांना पाठिंबा दिला आहे.

एका ब्लॉगमधून आपली भूमिका पिचाई यांनी स्पष्ट केली आहे. अमेरिकेची खासियत ‘विविधता ही आहे. हीच विशेषता या देशाची सगळ्यात मोठी शक्ती आहे. सुरुवातीपासूनच अमेरिकेने प्रत्येकाला सामावून घेतल्यामुळे मुस्लिमांविषयी होणाऱ्या चर्चेला संपवले पाहिजे, असे पिचाईंना वाटत आहे. मी उच्च शिक्षणासाठी काही वर्षांपूर्वी अमेरिकेत आलो होतो. तेव्हा मला जराही वेगळे वाटले नव्हते. माझ्या घराप्रमाणेच असल्यासारखे मला येथे वाटले. मात्र असे व्हायला नको की, केवळ भीतीमुळे अमेरिका आपल्या मूळ वास्तविक मूल्य हरवून बसेल. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मार्क झुकरबर्गने आपण मुस्लिमांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे सांगितले होते. तसेच मुस्लिमांविरोधात सुरु असलेल्या राजकारणाबाबत त्याने नाराजी व्यक्त केली होती.

Leave a Comment