कोका कोला भारतातील उत्पादन घटविणार

Coca-cola
नवी दिल्ली: वस्तू आणि सेवा करांमुळे शीतपेयांवर कराचा बोजा वाढण्याची शक्यता असल्याने कोका कोला इंडिया या आघाडीच्या शीतपेय उत्पादक कंपनीने देशातील काही बॉटलिंग प्रकल्प बंद करण्याची शक्यता वर्तविली आहे.

वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यास शीतपेयांना आलिशान कार्स आणि तंबाखू उत्पादनांप्रमाणे तब्बल ४० टक्के कर आकारणी केली जाणार आहे. या करांमुळे शीतपेयांची मागणी घटण्याची शक्यता लक्षात घेऊन कोका कोला कंपनीचे देशातील काही बॉटलिंग प्रकल्प बंद करण्याची शक्यता कंपनीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केली आहे.

कोका कोलाचे देशभरात ५७ उत्पादन आणि बॉटलिंग प्रकल्प आहेत. या कंपनीत २५ हजार कर्मचारी काम करीत आहेत. भारतात सन २०२० पर्यंत ५०० कोटी डॉलर्सची गुंतवणूक करून देशात वाढणाऱ्या मध्यमवर्गात ग्राहकसंख्या वाढविण्याचे कंपनीचे ढोर होते. मात्र ‘जीएसटी’ लागू झाल्यास कंपनीला या धोरणाचा पुनर्विचार करावा लागणार आहे.

Leave a Comment