एक्वाने लाँच केला ‘एक्वा ५१२’

aqua
नवी दिल्ली – सर्वसामान्यांना २,६९९ रूपयांत परवडेल असा ३जी ‘एक्वा ५१२’ हा नवीन स्मार्टफोन स्मार्टफोन निर्मिती क्षेत्रातील भारतीय कंपनी ऍक्वाने लाँच केला आहे. डय़ुअल सिमचा हा फोन ब्लॅक आणि व्हाइट अशा दोन रंगात उपलब्ध करण्यात आला असून याचे ऑपरेटींग सिस्टिम अँड्रॉईड ४.४ बेस असून याचा डिस्प्ले ४ इंचाचा आहे. त्याचबरोबर यात ५१२ एमबी रॅम देण्यात आले आहे. यात १.२ गीगाहर्ट्ज मीडियाटेक डय़ुअलकोरचा प्रोसेसर देण्यात आला आहे. याची इंटरनल स्टोअरेज क्षमता ४ जीबीची असून याचा रियर कॅमेरा २ मेगापिक्सल आणि फ्रंट कॅमेरा ०.३ मेगापिक्सलचा आहे. यात 3जी, ब्ल्यूटय़ूथ, वायफाय, मायक्रोयूएसबी कनेक्टीव्हीटी देखील देण्यात आली आहे.

Leave a Comment