होंडाची सीबी हॉर्नेट १६० आर बाजारात दाखल

honda
नवी दिल्ली – सीबी हॉर्नेट १६० आर ही दुचाकी निर्मितीमध्ये भारतामध्ये दुसऱया क्रमांकाची कंपनी असणा-या होंडा मोटर सायकलने बाजारात दाखल केली आहे. कंपनीने बीएस-चार उत्सर्जन मानक असणारी हे देशातील पहिली दुचाकी असल्याचा दावा केला असून ही गाडी सिंगल डिक्स आणि डय़ुअल डिक्स विथ सीबीएस या दोन प्रकारामध्ये आहे. कंपनीने ही गाडी तरुणपिढीला डोळय़ासमोर ठेऊन बनविली आहे.

सुझुकी गिक्सर, टीव्हीएस अपाचे, बजाज पल्सर १५० आणि यमाहा एफझेड या गाडय़ांना टक्कर देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या गाडीची देशभरातील २१ शहरांमध्ये विक्री सुरू झाली असून नव्या वर्षाच्या सुरुवातीला देशातील ४२५० विक्रेत्यांकडे ही गाडी विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे. यागाडीची किंमत ७९,९००रु.(एक्स शोरुम) आहे.

Leave a Comment