पैसा कमावण्याचे दहा विचित्र मार्ग

collarge
रोजचे जगणे जगायचे तर पैशाशिवाय बात नाही भाऊ ! पैशाभोवतीच सारी दुनिया फिरते असे म्हणतातच. पण बहुतेक लोक पैसा मिळविण्याचे धोपट मार्गच स्वीकारताना दिसतात. म्हणजे नोकरी, व्यवसाय, एखादा उद्योग असे. बँकांवर डल्ले मारणे, अपहरण करणे, खंडण्या उकळणे, चोर्‍या दरोडे घालणे, जुगार खेळून पैसा मिळविणे हेही कांही मार्ग आहेत पण ते सर्रास कुणीही हाताळू शकत नाही. आपल्याला कदाचित माहिती नसेल पण या शिवायही अन्य कायदेशीर मार्गानेही लोक अमाप पैसा कमावतात. मात्र हे मार्ग जरा विचित्र आहेत.त्यामुळे त्यांना आपण अपारंपारिक मार्ग म्हणू शकतो. यातील कांही पद्धती हास्यास्पदही वाटतील पण त्यातूनही पैसा खूप मिळतो बरं का!

१)मानवी केस विक्री
1-Selling-Human-Hair
जगात आज हा व्यवसाय तेजीत आहे. ज्यांना लांब, सुंदर केसांचे वरदान आहे अशा महिला यातून मोठी कमाई करू शकतात. कलप न वापरलेले व डाय न केलेले केस असतील तर त्याला प्रचंड किंमत मिळते. हे केस विग बनविणे, गंगावने बनविणे यासाठी वापरले जातात. हा पूर्णपणे कायदेशीर व्यवसाय आहे. अनेक महिला जाणीवपूर्वक केस वाढवितात आणि ते कापून विक्री करतात. कांही वेळा आर्थिक गरज भागविण्यासाठीही हे केले जाते.यात भारत आणि रशिया हे दोन देश आघाडीवर आहेत. इतकेच नव्हे तर ब्रिटीश सिंगर मेलियाने या उद्योगावर एक डॉक्युमेंटरीही बनविली होती.

२)कंपनी लोगोचे टी शर्ट घालणे
2-Wearing-T-Shirts
हे वाचून तुम्हाला असे वाटत असेल की यातून कितीसा पैसा मिळणार तर तुम्ही चूक करताय. ही कल्पना आगळीवेगळी आहे खरी. ती सुचली जेसन सँडलर या युवकाला २००५ साली. त्याने अनेक कंपन्यांचा पाठपुरावा केला आणि त्यांच्या कंपन्यांचे लोगो असलेले टीशर्ट वापरण्याची तयारी दाखविली. जेथे तो हे टीशर्ट घालेल तेथे कंपनीविषयीची माहितीही तो देणार होता. कंपन्यांना ही कल्पना आवडली आणि त्यांनी जेसनला त्यासाठी फी देणे सुरू केले. बघता बघता हा व्यवसाय इतका वाढलाय की जेसनने चार पगारी टीशर्ट वेअरर ठेवले आहेत. मागणीच प्रचंड आहे त्याला तो काय करणार? गेल्या पाच वर्षात त्याने त्याची फीही वाढविली आहे. सध्या त्याची वर्षाची कमाई आहे ५ लाख डॉलर्स.

३)गेमिंग
3-gaming
व्हिडीओ गेमिंग जेव्हा प्रथमच मेनस्ट्रीममध्ये आले तेव्हा पालक आणि उद्योग जगत ही मुलाबाळांच्या करमणुकीची सोय म्हणून त्याकडे पाहात होते. केवळ छंद म्हणून हे खेळ खेळायचे त्यातून कितीसा पैसा कंपन्यांना मिळणार असेच सुरवातीला वाटत होते. मात्र आज हा उद्योग जगातला सर्वात एक्सायटिंग आणि आणि सर्वाधिक फायदेशीर उद्योग आहे. अनेकांनी प्रोफेशनल गेमर्स म्हणून मान्यता मिळविली आहे. त्यांच्या स्पर्धा होतात आणि त्यात लक्षावधी डॉलर्सची बक्षीसे दिली जातात. इतकेच नव्हे तर ऑनलाईन लक्षावधी प्रेक्षक या स्पर्धा पाहतात. द इंटरनॅशनल या प्रसिद्ध स्पर्धेचे बक्षीस आहे १० लाख डॉलर्स.

४)सुसाईड डॉक्टर
4-Suicide-Doctor
ज्यांना आयुष्य संपवायचे आहे त्यांना विषारी इंजेक्शन देऊन मुक्त करण्याचा हा धंदा. ऐकायला विचित्र वाटेल पण जगभरात अशी सुसाईड हेल्प करणारी किलनिक वाढत चालली आहेत. ही कल्पना प्रथम प्रत्यक्षात आणली जॅक केव्होर्विन या अमेरिकन पॅथॉलॉजिस्टने. डाईंग इज नॉट ए क्राईम या विधानाचा आधार त्यासाठी त्याने घेतला होता. त्यावर खूप वादविवादही झडले. मात्र आता लोकांनी हा व्यवसाय गंभीरपणे घेतला आहे. स्वित्झर्लंडमधील डिग्निटस हे प्रसिद्ध किलनिक हे काम मोठ्या प्रमाणावर करते. त्यांनी आजपर्यंत १ हजाराहून अधिक लोकाना आत्महत्त्या करण्यासाठी सहाय्य केले आहे असे सांगितले जाते. अर्थात ही मदत पैसा घेऊनच केली जाते.[nextpage title=”५)ओशिआ”]

५)ओशिआ
5-Oshiya
जपानमधली मोठी शहरे म्हणजे कंजस्टेड स्पॉट बनली आहेत. कामांच्या वेळात स्टेशनवर होणारी गर्दी आणि त्यातून गाडीत जागा मिळविणे म्हणजे दिव्यच. त्यामुळे तेथे ओशिआंचा व्यवसाय तेजीत आहे. जपानमधील अनेक स्टेशन्शनी असे ओशिया चांगले पैसे मोजून कामावर ठेवले आहेत.काय करतात हे लोक? तर गाडी अगदी तुडुंब भरून आली तरी स्टेशनवरील लोकांना गाडीची दारे बंद व्हायच्या आत गाडीत ढकलतात. तसेच टॅक्सीमध्ये चढण्यासाठी लोक फारच गर्दी करू लागले तर त्यांना बाहेर खेचतातही. म्हणजे लोकांना गर्दीच्या डब्यात घुसविणे आणि टॅक्सीत गर्दी करणार्‍याना बाहेर खेचणे हे त्यांचे काम.

६)रूदाली
6-Professional-Mourner
हा शब्द खास भारतीय असला तरी असे प्रोफेशनल रडे परदेशातही आहेत. म्हणजे एखादा माणूस निवर्तला तर त्याच्या फ्यूनरलच्या वेळी रडण्यासाठी भाड्याने प्रोफेशनल मोनर्स आणले जातात. हा प्रकार आफ्रिकेत लोकप्रिय आहे. अगदी बायबलमध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आहे. इसेक्समध्ये आयन रॉबर्टसन याने रेंट ए मोर्नर हा व्यवसायच सुरू केला आहे.आपल्याकडे राजस्थानात अशा रूदाली म्हणजे मर्तिकाच्या वेळी भाड्याने येणारे रडे. हे काम महिला करतात. ही प्रथाही फार जुनी आहे.

७)सेलिंग डर्ट
7-Selling-Dirt
नावावरून फारसा बोध झाला नाही का? हा व्यवसाय म्हणजे लोकांच्या भावनांना हात घालण्याचा व त्यातून पैसा मिळविण्याचा व्यवसाय आहे. पट बर्क या आयर्लंडमधील नागरिकाची ही भन्नाट कल्पना. आयर्लंड सोडून अन्य ठिकाणी स्थायिक झालेल्या लोकांच्या मरणाचा फायदा हा उठवतो. म्हणजे आपल्या देशाच्या मातीची ओढ कुणालाही असतेच. अशा परदेशस्थ लोकांच्या धडग्यांवर मातृभूमीतील माती पडावी यासाठी तो आयर्लंडमधील मातीचे बॉक्स विकतो. एक बॉक्स १५ डॉलर्सला देतो शिवाय घरपोच डिलिव्हरी. खोटे वाटेल पण बर्कचा हा व्यवसाय त्याला वर्षाला १० लाख डॉलर्सची कमाई करून देतो.

८)प्रोफेशनल स्लीपर्स
8-Professional-Sleeper
झोपून पैसा कसा मिळवायचा याचा उत्तम नमुना म्हणजे हा उद्योग. बाजारात कोणतेही उत्पादन आणायचे तर त्याच्या अनेक प्रकारच्या चाचण्या अगोदर केल्या जातात. बेड, मॅट्रेसेस ही उत्पादनेही त्याला अपवाद नाहीत. या कंपन्या आपल्या उत्पादनांच्या चाचण्या घेण्यासाठी प्रोफेशनल स्लीपर्स म्हणजे पैसे घेऊन झोपणारे लोक हायर करतात. ते आराम करत असताना त्यांचा हार्टरेट मॉनिटर केला जातो. त्यातून बेड अथवा मॅट्रेसेस किती आरामदायक आहेत याच्या चाचण्या घेतल्या जातात. हेलसिंकीतील हॉटेल फिन गतवर्षी चर्चेत आले ते याच कारणावरून. त्यांनी आपल्या हॉटेलमधील रूम्स किती आरामदायक आहेत याची चाचणी घेण्यासाठी प्रोफेशनल स्लिपर्ससाठी जॉब व्हेकन्सी असल्याची जाहिरात दिली आणि त्यांच्या या कामासाठी ६०० अर्ज आलेही.

९)इटिंग
9-Eating
म्हणजे खादडायचे आणि पैसे कमावायचे हा उद्योग. सध्या ही क्रेझही वाढली आहे आणि त्यात महिला आघाडीवरल आहेत. कांही महिलांनी खाणे हेच आपले करियर केले आहे. त्यांना प्रोफेशनल इटर्स असे म्हणतात. अमेरिकेतील ओहिओची रहिवासी डोना सिंप्सन त्यातील एक. जगातील वजनदार महिला बनण्याचे तिचे स्वप्न आहे. तिने स्वतःची वेबसाईटही सुरू केली आहे. त्यावर वर्गणी भरून लोक ती काय काय आणि किती खातेय हे पाहू शकतात. तिला खाणे पुरविण्यासाठी अनेक कंपन्याही पुढे आल्या आहेत. अर्थात डोना त्यासाठी कंपन्यांकडून चांगला पैसाही घेते. कांही कंपन्या आपलेच खाद्यपदार्थ तिने खावेत म्हणून तिला महिन्याला ९ हजार डॉलर्स पगारही देतात म्हणे.

१०)कौमार्य विक्री
10-Selling-Virginity
पैसा मिळविण्याचा हा जगातील सर्वात वादग्रस्त विषय. प्रचंड पैसा अगदी थोड्या अवधीत यातून मिळतो खरा पण आपल्या रेप्युटेशनला कायमचा झटकाही देणारा हा मार्ग. आजकाल मात्र हा मार्गही सरधोपट बनला आहे. म्हणजे अशा जाहिराती वेबसाईटवर सर्रास दिल्या जातात. यातील सर्वात प्रसिद्ध केस ब्राझिलच्या २१ वर्षीय कॅटरिना मिगलीओरिनीची. तिनेही तिचे कौमार्य जाहिरात देऊन असेच अज्ञान व्यक्तीला विकले व त्यातून ७ लाख डॉलर्स मिळविले असे सांगितले जाते. नंतर तिने कौमार्य अजूनही अबाधित आहे असा खुलासा करून पुन्हा एकदा कौमार्य विक्रीसाठी असल्याची जाहिरात दिली होती.

1 thought on “पैसा कमावण्याचे दहा विचित्र मार्ग”

  1. Mi 1 khup chhan writer v lyrist ahe.
    But im fresher …. tr mala kaam milel.
    8451917516 _ 8286559734 Plz…

Leave a Comment