‘व्हॅट’मध्ये सरकारकडून वाढ होण्याचे संकेत

vat
नागपूर – मंगळवारी नागपुरात काँग्रेसने प्रचंड मोर्चा काढून राज्य सरकारवर संपूर्ण कर्जमाफीसाठी दबाव टाकला असला तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संपूर्ण कर्जमाफीच्या निर्णयाविरोधात ठाम असून सुमारे १० हजार कोटींहून अधिक मदतीचे पॅकेज शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दिले जाण्याची शक्यता आहे. मात्र राज्याची आर्थिक परिस्थिती आधीच गंभीर असताना हा आर्थिक बोजा पेलणे अवघड असल्याने काही करांमध्ये एक-दोन टक्के वाढ करून उत्पन्न वाढविण्याच्या पर्यायांवर विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे करदात्यांवर आणखी करवाढीचे संकट कोसळणार आहे.

निधीची शासकीय तिजोरीत चणचण असल्याने हा निधी उभारण्यासाठी मूल्यवर्धित करात (व्हॅट) एक-दोन टक्के वाढ करण्याशिवाय अन्य मार्ग नसल्याचे सूत्रांनी सांगितले. आंध्र प्रदेश व अन्य काही राज्यांमध्ये १५ टक्के व्हॅट असून, तो महाराष्ट्रात साडेबारा टक्के आहे. दुष्काळी खर्च वाढल्याने दोनच महिन्यांपूर्वी सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर सरसकट दोन रुपये अधिभार लागू केला होता. आता आणखी करवाढ करून खर्च भागविण्याची योजना आहे.

Leave a Comment