पाकच्या सहकार्यामुळे भारतीय बासमतीला आंतरराष्ट्रीय ओळख प्राप्त

basmati
दिल्ली- बासमतीला भौगोलिक ओळख मिळविण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न यशस्वी ठरले असून पाकच्या सहकार्यामुळे भारतीय बासमतीला नवी आंतरराष्ट्रीय ओळख प्राप्त झाली आहे. लांब दाण्याचा, अत्यंत खूशबूदार बासमती गंगेच्या मैदानी प्रदेशातच होतो या भारताच्या दाव्याला पाकिस्तानने जागतिक स्तरावर समर्थन दिले आहे. भारताला या बासमतीच्या निर्यातीतून दरवर्षाला २९ हजार कोटींची कमाई होते.

हा खास बासमती पाक व्याप्त पंजाब व भारताच्या ७७ जिल्ह्यात पिकविला जातो. एखाद्या विशिष्ट भागातच एखादे खास उत्पादन होत असेल तर त्याला भौगोलिक ओळख (जी आय) मिळते. भारताच्या गंगा मैदान भागातील ७७ जिल्ह्यात बासमतीची शेती परंपरेने सुरू आहे. जी आय मिळालेल्या उत्पादनाचे पेटंट घेता येते व ट्रेडमार्कही मिळू शकतो. पाकबरोबर या संदर्भातच वाद सुरू होता. या बासमती निर्यातीत भारताचा हिस्सा ८५ टक्के तर पाकचा १५ टक्के आहे. मात्र शेजारी तांदूळ उत्पादक चीनकडून या दोन्ही देशांना मोठे आव्हान निर्माण झाले आणि या भारत व पाकने बासमती संरक्षित करण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे भारतीय बासमतीला आंतरराष्ट्रीय ओळख प्राप्त होऊ शकली.

Leave a Comment