पॅनासोनिकचा नवा इलुगा मार्क सुरक्षित स्मार्टफोन

eluga
पॅनोसोनिकने त्यांच्या नव्या इलुगा मार्क स्मार्टफोनमध्ये युजरच्या सुरक्षेची पुरेपूर काळजी घेतली असून यात पर्सनल अकौंट व क्लाऊड डेटा पूर्णपणे सुरक्षित राहतो असा दावा केला आहे. हा फोन ११९९० रूपयांत भारतात उपलब्ध करून दिला गेला आहे. रॉयल गोल्ड व मेटेलिक ग्रे फिनिशमध्ये तो उपलब्ध आहे.

या स्मार्टफोनसाठी ५ इंची डिस्प्ले, अॅँड्राईड ५.१ ओएस, २ जीबी रॅम, १६ जीबी इंटरनल मेमरी ती कार्डच्या सहाय्याने ३२ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा, एलईडी फ्लॅशसह १३ एमपी चा मेन व ५ एमपीचा फ्रंट कॅमेरा, फोर जी एलटीई सपोर्ट अशी अन्य फिचर्स आहेत. फिंगरप्रिट टच सेन्सरही दिला गेला आहे. यात सिंगल टच अॅक्सेसच्या माध्यमातून युजर एकावेळी आठ विविध फिंगरप्रिट कॉन्फीगर करू शकणार आहे.

Leave a Comment