‘हिरो’ची स्टायलिश ‘ड्युएट’ बाजारात

hero
पुणे – भारतातील सर्वात मोठी टू-व्हीलर निर्माती कंपनी असलेल्या हिरो मोटोकॉर्प लिमिटेडने ग्राहकांना अधिक स्टायलिश, अत्याधुनिक आणि बाजारपेठेतील प्रचलित कलांना अनुसरुन दाखल केलेली उत्पादने देऊ करण्याचे आश्वासन पाळताना सर्वांचे लक्ष लागून राहिलेली ‘ड्युएट’ ही नवी स्कूटर बाजारात आणली. एका महिन्यापूर्वीच दाखल केलेल्या ‘माएस्ट्रो एज’ नंतर दाखल करण्यात आलेली ही अजून एक नवी स्कूटर आहे. या दोन्ही स्कूटर्स सर्व शोरुममध्ये विक्रीकरिता उपलब्ध आहेत.

संपूर्णपणे नव्या प्लॅटफॉर्मवर या दोन्ही स्कूटर्स तयार करण्यात आल्या आहेत. हिरोच्या इन-हाऊस तंत्रज्ञानाचे सहाय्य घेऊन तयार करण्यात आलेल्या या पहिल्या स्कूटर्स आहेत. ड्युएटच्या एलएक्स व्हर्जनची किंमत ४९,२०० रूपये (एक्स-शोरुम पुणे) असून व्हीएक्स व्हर्जनची किंमत ५०,७०० रूपये (एक्स-शोरुम पुणे) आहे. माएस्ट्रो एजच्या एलएक्स व्हर्जनची किंमत ५१,००० रूपये (एक्स-शोरुम पुणे) असून व्हीएक्स व्हर्जनची किंमत ५२,००० रूपये (एक्स-शोरुम पुणे) आहे.

Leave a Comment