पुन्हा धावणार दार्जिलिंगची सुप्रसिद्ध टॉय ट्रेन

toy-train
दार्जिलिंग : पाच वर्षाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा चहाच्या मळ्यामधून दार्जिलिंगची जगप्रसिद्ध टॉय ट्रेन धावणार आहे. कुर्सिंयांग ते न्यू जलपाईगुडी दरम्यानची ही सेवा २०१० मध्ये दरड कोसळ्यामुळे बंद करण्यात आली होती. आता नाताळाला ही टॉय ट्रेन पुन्हा धावण्यासाठी सज्ज झाली आहे.

तुम्ही अनेक हिंदी चित्रपटात दार्जीलिंगची ही प्रसिद्ध टॉय ट्रेन बघितली असेल. या ट्रेनमधून सफर करण्याचा मोह तुम्हालाही झाल्याशिवाय राहणार नाही. ही ट्रेन गेल्या पाच वर्षांपासून बंद होती. पण लवकरच ती सुरु होणार आहे. २०१० मध्ये दार्जीलिंग जिल्ह्यातील कुर्सियांग परिसरात दरड कोसळल्यामुळे या टॉय ट्रेनच्या रुळांचे मोठे नुकसान झाले होते. तेव्हापासून कुर्सियांग ते न्यू जलपायीगुडी दरम्यान ही ट्रेन सेवा बंद करण्यात आली होती.

या रेल्वे ट्रॅकच्या दुरुस्तीचे काम पूर्ण गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात करण्यात आले आणि त्यानंतर या मार्गावर टॉय ट्रेनची अनेकवेळा चाचणी घेण्यात आली. यावर्षी १२ जुनला पुन्हाही सेवा सुरु करण्यात आली मात्र पुन्हा दरड कोसळ्यामुळे ती बंद करण्य़ात आली.आता पुन्हा एकदा या मार्गची पाहणी करण्यात आली असून नाताळा दरम्यान दार्जिलिंगची ही जगप्रसिद्ध टॉय ट्रेन पुन्हा धावणार आहे.

ही सेवा सुरु करण्यापूर्वी न्यू जलपाईगुडी ते दार्जिलिंग दरम्यानच्या अरुंद मार्गची पाहणी करण्यात येणार आहे. दार्जिलिंगची ही टॉय ट्रेन जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र असून युनेस्कोने या ट्रेनला वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा दिला असून १९९९ मध्ये दार्जिलिंग हिमालय रेल्वेला वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून घोषीत केले आहे.

Leave a Comment