या जपानी फोनची करा साबणाने धुलाई

soap-proof
मुंबई : वॉटरप्रूफ फोनच्या एण्ट्रीमुळे स्मार्टफोन जगतात निर्माण झालेली उत्सुकता आता कमी झाली आहे. मात्र त्यापुढचे पाऊल नाविन्यपूर्ण प्रयोगासाठी प्रसिद्ध असलेल्या जपानने टाकले आहे. कारण आता जपानने एक स्मार्टफोन बनविला आहे, जो पाण्यात पडला तरी तो सुरक्षित असेलच, पण या फोनला तुम्ही साबणानेही धुऊ शकता.

जगातला पहिला ‘सोप प्रूफ फोन’ म्हणजेच साबणाने धुता येणारा फोन एका जापनीज कंपनीने लाँच केला आहे. हा साबणाने धुता येणारा फोन क्योसेरा कंपनीने ‘डिग्नो रॅफरे’ बाजारात आणला असून हा फोन आगामी शुक्रवारी जपानी बाजारात उपलब्ध होणार आहे.

हा फोन तुम्हाला कंपनीच्या नव्या तंत्रज्ञानामुळे बेडरूम, किचनसह आता बाथरूममध्येही वापरता येईल. हा फोन सर्व वातावरणात वापरता येईल, असा दावा कंपनीने केला आहे. जर फोन घाण झाला, धूळ, कचरा अडकला तर तो साफ करण्यासाठी मोठ्या कसरती कराव्या लागतात. मात्र जपानच्या या तंत्रज्ञानामुळे फोन थेट पाण्यात टाकून साबणाने धुता येणार आहे.

जपानी ‘डिग्नो रॅफरे’ फोनची वैशिष्ट्य – याफोनची स्क्रीन ५ इंचाची एचडी असून डिस्प्ले ७२० पिक्सलचा आहे. याचे ऑपरेटिंग सिस्टिम अँड्रॉईड ५.१ लॉलीपॉपवर आधारित असून यात २जीबीचे रॅम देण्यात आले आहे. त्याचबरोबर याची इंटरनल मेमरी १६ जीबीची आहे. याचा कॅमेरा १३ मेगापिक्सलचा आहे. तर याच्या बॅटरीची क्षमता ३००० mAh एवढी आहे आणि याची किंमत ४६५ डॉलर म्हणजे अंदाजे ३१ हजार रुपये आहे.

Leave a Comment