टाटांची एसयूव्ही नेक्सन २०१६ येणार तर हचबॅक जीका आली

neksan
टाटांनी तरूणांना आकर्षिक करण्यासाठी खास वेगळ्या प्रकारे डिझाईन केलेली हचबॅक जीका नावाने बाजारात आणली आहे. तर त्यांची एसयूव्ही नेक्सन २०१६ च्या अखेरी बाजारात धडकणार आहे. नेक्सनच्या माध्यमातून टाटा समुह एसयूव्ही क्षेत्रात पदार्पण करत आहे. दिल्ली येथे फेब्रुवारीत होत असलेल्या ऑटो एक्स्पोमध्ये नेक्सन सादर केली जाईल असे समजते.

दरम्यान टाटांनी त्यांची इंडिका बंद करून त्या जागी तरूणाईला भावेल अशी हचबॅक बाजारात आणली आहे. जीका नावाने आलेली ही गाडी टाटांच्या पारंपारिक डिझाईनपेक्षा बरीच वेगळी आहे. नुकत्याच सादर झालेल्या झेस्ट व बोल्टपेक्षाही अधिक चांगले डिझाईन या गाडीला असून ती साधारणपणे ह्युंडाईच्या आय टेन व फोर्डच्या नव्या फिगोशी साध्यर्म दाखविणारी आहे. पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही व्हेरिएंटमध्ये ती उपलब्ध असून तिच्या किमती साडेतीन लाखांपासून आहेत.

1 thought on “टाटांची एसयूव्ही नेक्सन २०१६ येणार तर हचबॅक जीका आली”

Leave a Comment