व्हॉटस अॅपला टेलिग्रामची भीती

whatsapp
मुंबई : व्हॉटस अॅपचा ई-कॉमर्समध्ये दबदबा असताना, टेलिग्राम सोबत व्हॉटस अॅपने खिलाडू वृत्ती दाखवायला हवी होती, पण ती खिलाडूवृत्ती व्हॉटस अॅप दाखवत नाही, यावरून व्हॉटस अॅपला स्पर्धक टेलिग्रामची चांगलीच भीती असल्याचे दिसून येत आहे.

कारण टेलिग्रामच्या अँड्रॉईड फोनवर येणाऱ्या लिंक व्हॉटस अॅपचे नवीन अपडेटेड स्वरूप २.१२.३६७ मुळे ब्लॉक होत आहेत. व्हॉटस अॅपवर टेलिग्राममधून पाठवलेली लिंक ब्लॉक होते, ती ओपन होत नाही, सब डोमेन डॉट टेलिग्रामने सुरू होणाऱ्या लिंक व्हॉटस अॅप ब्लॉक करत आहे.

असे व्हॉटस अॅपकडून होणे अपेक्षित नाही, कारण आता फेसबुककडे व्हॉटस अॅपची मालकी आहे, फेसबुकची लिंक ट्वीटर ब्लॉक करत नाही किंवा यू-ट्यूब व्हिडीओची लिंक फेसबुकवर ब्लॉक झाली तर काय हंगामा होईल, असाच टेलिग्राम आणि व्हॉटस अॅपचा प्रकार आहे.

Leave a Comment