
नवी दिल्ली : एचटीसीने ए ९ आणि डिझायर ८२८ हे दोन नवे स्मार्टफोन अॅप्पल आणि सॅमसंग यासारख्या ब्रॅन्डला टक्कर देण्यासाठी लॉन्च केले आहेत. हे दोन्ही फोन डिसेंबर महिन्यात बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकतात असे एचटीसी कंपनीकडून सांगण्यात आले असून यातील ए ९ ची किंमत अजूनही गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. एचटीसी ए ९ हा सर्वात आधुनिक अँड्रॉइड ६.० माँशमेलो असणारा पहिला स्मार्ट फोन आहे.
अॅप्पल, सॅमसंगला टक्कर देणार एचटीसीचा ए ९
काय आहेत एचटीसी ए ९ चे फिचर्स – ए ९ला ५ इंच फुल एचडी एमोलेड स्क्रीन, कोरींग गोरीला ग्लास दिले आहे. त्याचबरोबर यात ६४ बिट ऑक्टा कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगनचा प्रोसेसर आहे. ए ९ हा फोन २ आणि ३ जीबी रॅम अशा दोन वेगवेगळ्या व्हर्जनमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. याचा रियर कॅमेरा १३ मेगापिक्सलचा तर फ्रन्ट कॅमेरा ४ मेगापिक्सलचा आहे. १६ आणि ३२ जीबी मेमरी असे दोन पर्यायामध्ये उपलब्ध आहे. याच्या बॅटरीची क्षमता २१५० एमएएच एवढी आहे. हा फोन ४ जी सपोर्ट आहे.
काय आहेत एचटीसी ८२८ चे फिचर्स – याफोनमध्ये डुअल सिम, ५.५ इंच फुल एचडी स्क्रीन, १.५ गीगाहर्ट्स ऑक्टाकोर प्रोसेसर, २ जीबी रॅम, १३ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा, ४ मेगापिक्सलचा फ्रन्ट कॅमेरा, १६ जीबी इन्टरनल मॅमरी, २ जीबी क्सटंनल मॅमरी, २८०० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.
