तब्बल सात हजारांनी स्वस्त झाला नेक्सस ५ एक्स

nexus
नवी दिल्ली : गुगलचा ‘नेक्सस ५एक्स’ हा स्मार्टफोन महिन्याभरापूर्वीच लाँच करण्यात आला होता. आता हा स्मार्टफोन तब्बल सात हजार रुपयांनी स्वस्त झाला आहे. हा स्मार्टफोन ऑनलाईन साईटवर मूळ किंमतीपेक्षा सात हजारांनी स्वस्त आहे. या स्मार्टफोनची अॅमेझॉनवर किंमत २४,९०० तर फ्लिपकार्टवर याची किंमत २५, २४९ इतकी आहे.

गेल्या महिन्यात लाँच करण्यात आलेल्या स्मार्टफोनची किंमत १६ आणि ३२ जीबीसाठी अनुक्रमे ३१,९०० आणि ३५,९०० इतकी ठेवण्यात आली होती. मात्र स्मार्टफोनच्या विक्रीत वाढ होण्यासाठी १६ जीबीच्या स्मार्टफोनची किंमत कंपनीने कमी केली आहे.

१.८२ गिगाहर्टझ हेक्सा कोर स्नॅपड्रॅगनचा प्रोसेसर या स्मार्टफोनमध्ये असून रॅम दोन जीबीचे आहेत. यात १२.३ मेगापिक्सेल रेयर आणि ५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच फोरजी कनेक्टीव्हीटीला हा स्मार्टफोन सपोर्ट करतो. यासह फिंगरप्रिंट स्कॅनर हे या स्मार्टफोनचे आणखी एक वैशिष्ट्य आहे.

Leave a Comment