आपला महाराष्ट्र आहे सर्वांत कर्जबाजारी राज्य

rbi
मुंबई : देशातील सर्वांत जास्त औद्योगिक राज्य म्हणून प्रसिद्ध असणा-या महाराष्ट्रावर सर्वाधिक कर्जबाजारी राज्य असल्याचा शिक्का बसला आहे. त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर हे कर्ज आहे. रिझर्व्ह बँकेने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार महाष्ट्रातील प्रत्येक माणसावर २९ हजार ६६१ रुपये कर्ज आहे. राज्य सरकारच्या डोक्यावर तब्ब्ल ३ लाख ३८ हजार ७३० कोटी रुपयांचा कर्जाचा बोजा आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार उत्तर प्रदेश दुस-या क्रमांकावर तर पश्चिम बंगाल तिस-या क्रमांकांचे कर्जबाजारी राज्य आहे.

महाराष्ट्राचे शेजारील राज्य गुजरातचा कर्जबाजारीपणाच्या बाबातीत पाचव्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रावर एवढे मोठे कर्ज असूनही राज्यभरात नागरी सुविधा पुरविण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. अशी टीका केली जात आहे. उत्तर प्रदेशवर २,४४५,१ अब्ज रुपयांचे कर्ज, पश्चिम बंगालवर २,११५.० अब्ज रुपये कर्ज बोजा आहे.

Leave a Comment