
जिओनी या चिनी कंपनीने त्यांचा मॅरेथॉन एम फाईव्ह स्मार्टफोन भारतात लाँच केला असून ई कॉमर्स साईट फ्लिपकार्टवर तो १७९९९ रूपयांत उपलब्ध आहे. काळा, गोल्डन व व्हाईट अशा तीन व्हेरिएंटमध्ये ग्राहकांना तो मिळू शकेल. या फोनची बॅटरी चार दिवस चालेल असा कंपनीना दावा आहे.
जिओनीचा दमदार बॅटरीवाला मॅराथॉन एम फाईव्ह आला
या फोनला ३०१० एमएएच पॉवरच्या दोन बॅटरी दिल्या गेल्या आहेत. म्हणजेच फोनला ६०२० एमएएच पॉवरची बॅटरी आहे. ही बॅटरी चार दिवस पुरू शकेल असे कंपनीचे म्हणणे आहे. शिवाय एक्स्ट्रीम मोड फिचर मध्ये ५ टक्के बॅटरी ६५ तासांचा स्टँडबाय टाईम देऊ शकणार आहे. ५.५ इंची स्क्रीन, ३ जीबी रॅम, १६ जीबी इंटरनल मेमरी, मायक्रो एसडी कार्डने १२८ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा, ८ एम.पी.चा रियर कॅमेरा एलईडी फ्लॅशसह, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी ५ एम.पी चा फ्रंट कॅमेरा व अँड्राईड लॉलीपॉप ५.१ ओएस अशी त्याची अन्य फिचर्स आहेत.
