पुण्याच्या विद्यार्थ्याची ‘गूगल’झेप

google
पुणे : ‘गुगल’कडून तब्बल दोन कोटी रुपयाचे वार्षिक पॅकेजची ऑफर पुण्याच्या एका विद्यार्थ्याला मिळाली असून या २२ वर्षीय विद्यार्थ्याचे नाव अभिषेक पंत असे आहे.

अभिषेक सध्या आयआयटी खारगपूरमध्ये कम्प्युटर सायन्सच्या अखेरच्या वर्षाला शिकत आहे. नुकतीच त्याने कॅलिफोर्नियात ‘गुगल’मध्ये आपली तीन महिन्यांची इंटनशिप संपवली होती.

याबाबत अभिषेकने दिलेल्या माहितीनुसार, गूगलमध्ये नोकरीसाठी त्याने दोन इन्टरव्ह्यू हे फोनवरुन दिले. त्यानंतर गूगलच्या डॉक्युमेंट कोडिंग करण्यासाठी त्याला सांगण्यात आले. त्यानंतर प्रोजेक्ट मॅनेजरने त्याची मुलाखत घेतली आणि अखेर त्यानंतर त्याला गूगलच्या डिझाइन सोल्युशनसाठी निवड करण्यात आली. अभिषेकचा जन्म आणि वाढ अमेरिकेतच झाली असून २००६ साली आपल्या कुटुंबीयांसोबत अभिषेक अमेरिकेतून भारतात परतला होता.

यानंतर अभिषेकचे आई-वडील आपल्या मुलांच्या शिक्षणाकरता आणि भविष्याकरता चिंतीत होते. भारतीय शिक्षण पद्दतीत मुले कसे स्वत:ला मिसळून घेतील, अशी त्यांच्या मनात शंका होती. परंतु, अभिषेकने हे करून दाखवले. डीपीएसचा विद्यार्थी असलेल्या अभिषेकने दहावीत तब्ब्ल ९७.६ टक्के मार्क मिळवले होते. सप्टेंबर २०१६ मध्ये तो गुगलमध्ये कामावर रुजू होईल. यासाठी अभिषेक खुपच उत्साहित आहे.

Leave a Comment