आता मोबाईलवरुन खरेदी करा सुझुकीची बाईक !

suzuki
नवी दिल्ली : स्नॅपडील या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवर सुझुकी या टू व्हिलर कंपनीने आपल्या बाईक्स खरेदीसाठी उपलब्ध करुन दिल्यामुळे अगदी मोबाईलवरुनही बाईक खरेदी करता येणार आहे.

सुझुकीने स्नॅपडील मोटर्स प्लॅटफॉर्मवर बाईक खरेदीवर एका वर्षाचा मोफत विमाही ऑफर केला असून स्नॅपडीलवरुन या ऑफरनुसार तुमच्या आवडीची बाईक निवडून तुमच्या जवळच्या डिलरकडून खरेदी करु शकता. पेमेंटही ऑनलाईन करण्याची सुविधा सुझुकीने उपलब्ध करुन दिली गेली आहे.

यात तुम्ही सुझुकीची बाईक ऑनलाईन खरेदी करताना ऑटो लोनसाठी ऑनलाईन अर्जही करु शकता. किंबहुना, जी बाईक तुम्ही खरेदी करणार आहात, त्या बाईकसाठी ऑटो लोन उपलब्ध असेल.

दरम्यान सुझुकीसह स्नॅपडीलवरुन हिरो मोटोकॉर्प आणि पियाजियो या बाईक्स आणि स्कूटर्सही खरेदी करता येणार आहेत. लवकरच महिंद्राही आपल्या ग्राहकांसाठी बाईक खरेदीची ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देणार आहे.

Leave a Comment