विंडोज १० टॅब्लेट अवघ्या साडेपाच हजारांत

penta
नवी दिल्ली : हल्ली चित्रपट पाहण्यासाठी, गेम खेळण्यासाठी स्मार्टफोनपेक्षा टॅब्लेटला अधिक पसंती असते आणि आपल्या खिशाला सहज परवडेल टॅब्लेट आपल्याला हवा असतो. आता तुमची चिंता दूर करणार आहे पँटा टेक्नॉलॉजी. या कंपनीने नवा पेंटा टी-पॅड डब्लू एस ८२० एक्स हा टॅब्लेट बाजारात आणला आहे.

त्याधिनुक फीचर्स देण्यासह या टॅब्लेटची किंमतही कंपनीने सर्वसामांन्यांच्या खिशाला परवडेल अशी ठेवली असून अवघ्या ५,४९९ रुपयांत तुम्ही टॅब्लेट खरेदी करु शकता.

असा आहे पेंटा टी-पॅड डब्लू एस ८२० एक्स
आठ इंचाचा डिस्प्ले, १२८०x८०० पिक्सलचे रीझेव्हुलेशन, इंटरनल मेमरी १६ जीबीची, प्रोसेसर १.३ गिगाहर्टझ क्वाड कोर, एक जीबी रॅम, दोन मेगापिक्सल रेयर आणि फ्रंट कॅमेरा, ऑपरेटिंग सिस्टम विंडोज १०, बॅटरी – ४०००एमएएच, ३जीची सुविधा यात देण्यात आली आहे.

Leave a Comment