विचित्र तरीही आकर्षक टॉप टेन रेस्टॉरंटस

[nextpage title=”विचित्र तरीही आकर्षक टॉप टेन रेस्टॉरंटस”]
collarge
जगभरातच रेस्टॉरंटसचा व्यवसाय भरभराटीला आलेला आहे कारण त्याचा थेट संबंध माणसाची अत्यंत निकडीची गरज असलेल्या भुकेशी आहे. व्यवसाय वाढता असला की त्यात स्पर्धा आलीच. त्याला रेस्टॉरंटचा अपवाद असण्याचे कारण नाही. आपल्याच रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांनी गर्दी करावी अशी कुठल्याही रेस्टॉरंट मालकाची इच्छा असते आणि ग्राहक यायला हवेत तर त्यासाठी कांही आकर्षणही हवे. आज जगभरातील अशी दहा विचित्र पण आकर्षक रेस्टॉरंटची माहिती तुमच्यासाठी देत आहोत.

१)मॉडर्न टॉयलेट रेस्टॉरंट- तैवान
1-Modern-Toilet,-Taiwan
नाव विचित्र आणि सजावटही विचित्रच असलेले हे रेस्टॉरंट ग्राहकांचे मात्र आवडते रेस्टॉरंट आहे. या रेस्टॉरंटची थीम बाथरूम किंवा टॉयलेटवर आधारित आहे. म्हणजे येथे आलेल्याला आपण टॉयलेट मध्ये आहोत असेच वाटते. बसायला टॉयलेट सीटच्या खुर्च्या, सिंकसारखे टेबल, युरिनलच्या आकाराचे ग्लास आणि टॉयलेट कंटेनरच्या शेपमध्ये असलेल्या भांड्यातून सर्व्ह केले जाणारे चॉकलेट आईस्क्रीम अशी त्याची वैशिष्ठ्ये. मे २००४ मध्ये हे रेस्टॉरंट सुरू झाले तेव्हा मालकाला ही थीम ग्राहकांना किती भावेल याची चिंता होती मात्र ते इतके लोकप्रिय झाले की दोन वर्षातच त्याचे मॉडेल रेस्टॉरंट हे नाव बदलून मॉडर्न टॉयलेट रेस्टॉरंट असे केले गेले.[nextpage title=”२)हार्ट अॅटॅक ग्रील-यूएस”]

2-Heart-Attack-Grill,-US
लासवेगास मध्ये असलेले हे रेस्टॉरंट प्रामुख्याने बर्गरसाठी प्रसिद्ध असले तरी ते बर्गर जॉईंटपेक्षा खूपच वेगळे आहे. याचा मालक जॉन बासो सांगतो, मी अत्यंत प्रामाणिकपणे माझ्या रेस्टॉरंटमधील पदार्थ तुमच्या आरोग्यासाठी चांगले नाहीत त्यांच्यापासून थोडे दूर रहा असे स्पष्ट सांगतो. जगभरात फास्टफूड विकणारा कुणीच असे सांगण्याचे धैर्य दाखविणार नाही मात्र मी ते दाखवतो. त्याच्या रेस्टॉरंटमध्ये १० हजार कॅलरीजचा बर्गर क्वाड्राफ बायपास बर्गर नावाने विकला जातो. रेस्टॉरंटची थीम हॉस्पिटलवर आधारित आहे आणि येथे काम करणार्‍या वेट्रेसेस नर्सचा युनिफॉर्म घालतात.[nextpage title=”३)हॅलो किटी रेस्टॉरंट-हाँगकाँग”]

3-Hello-Kitty-Restaurant,-H
मुळचे जपानची ही रेस्टॉरंट चेन जपानपेक्षाही हॉंगकाँगमध्ये अधिक लोकप्रिय आहे. हाँगकाँगच्या मालकाने नुकतेच याच नावाचे पहिले चायनीज रेस्टॉरंट सुरू केले आहे. या रेस्टॉरंटची सजावट हॅलो कीटी प्रमाणे असून येथे मिळणारे अन्नपदार्थही त्याच आकारात मिळतात. येथले पदार्थ अतिशय रूचकर आहेत मात्र ते बनविण्याची पद्धत अतिकिचकट आहे. फ्रेश श्रिंपबन नावाचा पदार्थ बनविण्यासाठी १७ स्टेप्स फॉलो कराव्या लागतात.[nextpage title=”४) सिरीयल किलर कॅफे-युके “]

4-Cereal-Killer-Café,-UK
युकेमधले हे पहिलेवहिले सिरीयल कॅफे असून यात १२० प्रकोरची सिरीयल्स, ३० विविध प्रकारचे दूध व २० विविध टॉपिग्ज खवैय्यांना निवडीची संधी देतात. येथे ब्रेकफास्ट, लंच अथवा डिनर असे कोणत्याही वेळी खादडायची सोय आहे. अॅल आणि गॅरी केरी हे जुळे भाऊ त्याचे मालक आहेत.[nextpage title=”५)बार्बी कॅफे-तैवान”]

5-Barbie-Cafe,-Taiwan
जगभर लोकप्रिय असलेल्या बार्बी डॉल थीमवरचे हे कॅफे अल्पावधीत लोकप्रिय बनले आहे. बार्बीची निर्माती कंपनी मटेलकडून बार्बी थीम वापरण्यासंबंधीची रितसर परवानगी मालकाने घेतली आहे आणि या यूएस टॉय उत्पादक कंपनीने बार्बी ब्रँड प्रमोशनसाठी ही परवानगी दिली आहे. येथे सगळेकांही अगदी गोड गुलाबी आहे. वेटर्स पिंक बार्बी लोगोचे शर्ट घालतात. प्रशस्त डायनिंग स्पेसही गुलाबीच आहे आणि आतल्या खुर्च्या टेबलेही गुलाबी रंगाचीच आहेत.[nextpage title=”६)इथाहा-मालदीव”]

6-Ithaa,-Maldives
जगातले पहिले अंडरवॉटर रेस्टॉरंट. हिंद महासागरात पाच मीटर म्हणजे १५ फुटांहूनही खोल पाण्यात असलेले हे फाईव्ह स्टार रेस्टॉरंट आहे. काचेच्या भिंती असलेल्या या रेस्टॉरंटमध्ये खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतानाच आजूबाजूने, डोक्यावरून जाणारे शार्क, कासवे, प्रवाळ असे समुद्री जीव पाहण्याची संधी येथे मिळते. इथली प्रकाशयोजना इतकी तीव्र प्रकाश देते की स्टाफ व ग्राहकांना डोळ्यांच्या संरक्षणासाठी गॉगल्स चढवावे लागतात. येथे एकावेळी चौदा ग्राहकच बसू शकतात आणि प्रत्येक जेवणाचा प्रत्येकी खर्च आहे सरासरी २०० डॉलर्स.[nextpage title=”७)गॉल्जह्युंग- बिजिंग”]

7-Guolizhuang,-Beijing
येथला मेन्यू वाचलात तर कदाचित तुमच्या पोटात ढवळायलाच लागेल. कारण येथे प्राण्यांच्या जननेंद्रियांपासून व गुप्तांगापासून बनविलेले पदार्थ सर्व्ह केले जातात.या रेस्टॉरंटचा मालक चायना सिव्हील वॉर मध्ये १९४९ साली पळून गेला पण त्याने पारंपारिक चीनी औषधांचा अभ्यास सुरू ठेवला होता. त्यात त्याला असे दिसून आले की रक्तातील कोलेस्टोरॉल कमी करण्यासाठी तसेच अनेक प्रकारच्या व्याधी दूर करण्यासाठी प्राण्यांच्या जननेंदियांपासून बनलेले पदार्थ उपयुक्त ठरतात. त्यातूनच त्याने हे अनोखे रेस्टॉरंट सुरू केले. येंथे लहानसहान प्राण्यांपासून वाघाच्या जननेंद्रियापासून बनलेले पदार्थ उपलब्ध आहेत. मात्र वाघाच्या पदार्थासाठी माहिनोनमहिने आधी बुकींग करावे लागते आणि या महागड्या दुर्मिळ डीशसाठी ५७०० डॉलर्स मोजावे लागतात.
या रेस्टॉरंटमध्ये साहजिकच धनाढ्य, उद्योजक, सरकारी अधिकारी यांचाच अधिक भरणा असतो.येथे प्रत्येकासाठी प्रायव्हेट रूममध्ये टेबल्स लावली जातात. त्यामुळे ग्राहकांना येथे खाताना आपल्याला कुणी पाहिले तर नाही ना ही चिंता रहात नाही.[nextpage title=”८)ट्विन स्टार्स-मास्को”]

8-Twin-Stars,-Moscow
हे आगळेवेगळे रेस्टॉरंट मुद्दाम भेट द्यावे असे आहे. येथे फक्त जुळी भावंडेच काम करतात. तसेच कामावर असताना त्यांना अगदी एकसारखे कपडेही घालावे लागतात. विशेष म्हणजे येथे येणारे ग्राहक जुळे असतील तर दोघांच्या जेवणाचे बील एकाच्या जेवणाइतके घेतले जाते. तिळी भावंडे आली तर एकाच्या खर्चात तिघे जेवू शकतात व चौपाळी आली तर एकाच्या खर्चात चार जणांचे उदरभरण होऊ शकते.[nextpage title=”९) डिनर इन द स्काय”]

9-Dinner-in-the-Sky
जगभर पसरलेली ही रेस्टॉरंट चेन प्रथम २००६ साली सुरू झाली आणि अल्पावधीत इतकी लोकप्रिय झाली की आता ४० देशांत त्यांच्या शाखा आहेत. हकुनामटाटा व द फन ग्रुपने मिळून पहिले रेस्टॉरंट बेल्जियममध्ये सुरू केले. येथे ग्राहकांना क्रेनच्या सहाय्याने आकाशात उंच नेऊन खाद्यपदार्थ सर्व्ह केले जातात. जेवणाशिवाय येथे लाऊंज इन द स्कायची सूविधाही आहे. यात स्वतंत्र टेबले. डान्स फ्लोअर अशी व्यवस्था आकाशात अधांतरी केलेली असते तर मॅरेज इन द स्काय, शोबिझ इन द स्काय अशाही सुविधा दिल्या जातात. शोबिझ मध्ये लाईव्ह पियोनो कन्सर्टचा आस्वादही घेता येतो.[nextpage title=”१०)सोल्डटेनकॅफे – इंडोनेशिया”]

10-Soldatenkaffee,-Indonesi
सूरू झाल्यापासून सतत चांगल्या अर्थाने चर्चेत असलेला हा कॅफे नाझी थीमवर आधारित आहे. दुसर्‍या जागतिक महायुद्धात नाझींनी माजविलेला हाहाकार आजतागायत कुणी विसरू शकलेले नाही. ज्या मालकाने नाझी थीमवर हे रेस्टॉरंट २०१३ मध्ये सुरू केले तेव्हा त्याला ठार मारण्याच्या धमक्या आल्या. अखेर त्याने रेस्टॉरंट बंद केले पण ते पुन्हा २०१४ साली सुरू केले. येथे हिटलरची वकतव्ये. त्याची पेंटींग्ज अशी सजावट असून येथले कर्मचारी नाझी गणवेश घालतात. मात्र त्यावरचे स्वस्तिक काढून टाकले गेले आहे.

Leave a Comment