धक्कादायक; पुरुषांना देखील मासिक पाळीचा त्रास

mc
नवी दिल्ली – महिलांना येणाऱ्या मासिक पाळीबद्दल तुम्ही आतापर्यंत ऐकले असेल. पण मासिक पाळीचा त्रास पुरुषांना देखील होतो हे ऐकले नसेल. होय, हे खरे आहे आणि ही बाब नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात समोर आली आहे. महिलांना मासिक पाळी दरम्यान ज्या प्रकारचा अनुभव येतो तसाच अनुभव २६ टक्के पुरूषांना येत असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

सुमारे अडीच हजार महिला आणि पुरूषांना या सर्वेक्षणात सहभागी करण्यात आले होते. त्यातील २/३ महिलांनी मान्य केले की त्यांच्या पतीला मासिक पाळी सारख्या समस्येचा अनुभवला येतो. यामध्ये २० टक्के महिलांनी मान्य केले की त्यांच्या तुलनेत या काळात त्यांच्या पतीला अधिक त्रास होतो.

प्रत्येक चौथ्या पुरूषाचे मानणे आहे की त्यांनाही मासिक पाळीची समस्या जाणवते. या पुरूषांनुसार महिन्याच्या एका विशिष्ट कालावधीत थकणे, अवस्थ वाटणे या सारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. मात्र या काळात महिलाप्रमाणे शारिरीक त्रासाला नाही तर मानसिक त्रासाला समोरे जावे लागते, असे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.

पुरुषांना येणाऱ्या मासिक पाळीच्या काळात ५६ टक्के पुरूषांनी सांगितले की, त्यांना चिडचिडेपणा सारख्या समस्येला सामोरे जावे लागते. तर ५१ टक्के पुरुषांना इतर दिवसांच्या तुलनेत अधिक थकल्या सारखे वाटते. ४३ टक्के पुरुषांना सारखी भूक लागल्याचा आभास होतो. तसेच एखाद्या गोष्टीत मन लागत नसल्याचे सांगितले. १२ टक्के पुरुषांनी वजनासंबंधी संवेदनशीलता जाणवत असल्याचे सांगितले तर ५ टक्के पुरुषांनी शरीरात मुरड येण्याची समस्येला सामोरे जावे लागत असल्याचे सांगितले.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment