आयफोन सिक्स सी नवीन वर्षात येणार

iphone
अॅपल आता नवीन कोणता स्मार्टफोन बाजारात आणणार याविषयी तर्कवितर्क लढविले जात असतानाच नवीन रिपोर्टनुसार आयफोन सिक्स सी बाजारात आणण्याची तयारी अॅपलने सुरू केली आहे. हा फोन २०१६ च्या मध्यात बाजारात दाखल होईल असे सांगितले जात आहे.

टेक न्यूज साईटवरील बातम्यांमध्ये या फोनचे कांही फिचर्सही उघड केले गेले आहेत. त्यानुसार आयफोन सिक्स सी साठी ४ इंची डिस्प्ले दिला जाईल. या फोनवर कंपनी अजून काम करते आहे मात्र हा फोन आयफोन फाईव्ह सी सारखाच असेल. फोनला टच आयडी, उत्तम प्रतीचा फेसटाईम कॅमेरा व एच.डी कॅमेरा दला जाईल व हा फोन अँड्राईड बेस असेल तसेच तो वायफाय व ब्ल्यू टूथ कनेक्टीव्हीटीलाही सपोर्ट करेल.

Leave a Comment