व्हॉटस अॅपच्या या सेटिंग्ज फॉलो करा आणि पैशांसह बॅटरीही वाचवा

whatsapp
तुमच्या मोबाईलवर व्हॉटस अॅपवर येणार फोटो आणि व्हिडीओ आपोआप डाऊनलोड होतात, यामुळे तुमचा इंटरनेट डेटा लवकरच खर्च होतो, तुमच्या खिशाला कात्री बसते. याव्यतिरिक्त फोनची बॅटरीही लवकर संपते आणि फोन तापतो यामुळे फोनचे आणि बॅटरीचेही आयुष्य कमी होते.

या तीनही कटकटींपासून मुक्ती हवी असेल तर व्हॉटस अॅपमध्ये खालील सेटिंग्ज करून घ्या, आणि कटकटीपासून मुक्ती मिळवा.
१) व्हॉटस अॅपवर क्लिक करा..
२) यानंतर व्हाटस अॅपवर सर्वात वरच्या बाजूला उजवीकडे तीन डॉट दिसतील. या डॉटवर क्लिक करा, ( टॅप करा).
३) यानंतर ५ पर्याय तुम्हाला दिसतील, सर्वात खाली पाचव्या नंबरवर सेटिंग्ज हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
४) सेटिंग्जवर क्लिक करा, यानंतर सेटिंग्जचे ऑप्शन उघडतील, यातील नंबर ४ वर असलेल्या चॅट सेटिंग्जवर क्लिक करा.
५) चॅट सेटिंग्जमध्ये नंबर २ वर, मीडिया ऑटो डाऊनलोड नावाचं ऑप्शन असेल, यावर क्लिक करा.
६) मीडिया ऑटो डाऊनलोड ऑप्शन उघडल्यानंतर व्हेन युजिंग मोबाईल डेटावर क्लिक करा.
७) यानंतर तीन ऑप्शन दिसतील, ई-मेज, ऑडिओ, व्हिडीओज या तीनही समोरील क्लिक काढून घ्या, आणि OK वर क्लिक करा, यानंतर तुम्हाला व्हॉटस अॅपच्या माध्यमातून येणारे फोटो, व्हिडीओंचं ऑटो डाऊनलोड बंद होणार आहे. ‘

तुम्हाला आलेले व्हिडीओ किंवा फोटोवर क्लिक केल्यानंतरच पाहता येतील, यामुळे तुमच्या डेटा प्लान कमी वापरात येईल, तुमचे पैसे, वाचतील फोनची बॅटरीही वाचेल आणि फोन तापणार नाही. एवढं सर्व समाधान तुम्हाला एका मिनिटाच्या आत हे समजून घेतल्यानंतर मिळणार आहे.

Leave a Comment