डाळींनंतर आता तांदूळ रडविणार?

rice
दिल्ली- कांदा, डाळी, मोहरी तेल यांच्या भाववाढीने ग्राहक हैराण झाला असतानाच यंदा तांदूळही ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणेल असा अंदाज असोचेमने व्यक्त केला आहे.

असोचेमने सादर केलेल्या अहवालानुसार सरकारकडे तांदळाची साठवण पुरेशा प्रमाणात नाही आणि यंदा कमी पावसामुळे खरीपाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटणार आहे. असोचेमचा हा अहवाल सध्याच्या बाजारातील परिस्थितीच्या बरोबर उलट आहे. कारण सध्या बाजारात गतवर्षाच्या तुलनेत तांदळाचे भाव किलोमागे २० ते ३० रूपयांनी कमी आहेत.प्रिमियम बास्मती तांदळाचे भावही गतवर्षीच्या तुलनेत ३० टक्क्यांनी कमी आहेत.

असोचेमच्या अहवालाप्रमाणे येत्या कांही महिन्यात तांदळाचे भाव चढू लागतील व भावात तेजीचे वातावरण कायम राहील. पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात पाऊस कमी झाल्याने या तांदूळ उत्पादक राज्यात उत्पादनात घट होणार आहे.

Leave a Comment