आता डिलीट करा फेसबुक फ्रेण्डच्या पोस्टवरची इतरांची कमेंटही

facebook
मुंबई : सतत वेगवेगळे बदल सर्वात लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईट फेसबुक आपल्या यूझर्ससाठी घेऊन येत असते. मोबाईलवर ब्राऊझर किंवा अॅपवरुन फेसबुक वापरणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी फेसबुकने आणली असून आता तुमच्या फेसबुक फ्रेण्डच्या पोस्टवर दुसऱ्या व्यक्तीने केलेली कमेंटही तुम्ही रिपोर्ट किंवा डिलीट करु शकाल.

नुकतेच मोबाईलवरुन फेसबुक पाहणाऱ्यांसाठी फेसबुकने हे नवे फीचर आणले आहे. यापूर्वी तुम्ही फक्त तुमच्याच पोस्ट किंवा स्टेटसवर असलेल्या इतरांच्या कमेंट्स डिलीट किंवा रिपोर्ट करु शकत होतात. मात्र आता तुम्हाला न आवडलेली, इतरांच्या फेसबुक पोस्टवरील कमेंटही तुम्ही डिलीट करु शकणार आहात. आतापर्यंत इतरांच्या पोस्टवरील कमेंट्स कॉपी करण्याची सुविधा उपलब्ध नव्हती. मात्र आता डिलीट, रिपोर्टप्रमाणेच ही कमेंट कॉपी करण्याचाही पर्याय असेल. ती कमेंट काही काळ प्रेस केल्यानंतर कॉपी, डिलीट, रिपोर्ट, कॅन्सल असे ऑप्शन येतील. त्यानंतर तुम्ही हवा तो पर्याय निवडू शकता.

Leave a Comment