आनंदी राहायचे असेल तर ‘फेसबुक’ला करा बाय बाय!

facebok
कोपनहेगन : सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकचा जास्त वापर करूनही तुम्ही आनंदी नसाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. एका संशोधनानुसार असे लक्षात आले आहे की, तुम्ही एक आठवडा फेसबुकचा वापर करणे टाळले तर जास्त आनंदी बनाल. हे नवे संशोधन डेन्मार्कमध्ये हॅपीनेस रिसर्च इन्स्टिट्यूटने केले आहे.

१,०९५ लोक या संशोधनात सहभागी झाले होते. या लोकांची दोन गटांत विभागणी केली होती. पहिल्या गटात अशा लोकांना सहभागी केले होते, ज्यांनी फेसबुकचा वापर सुरूच ठेवला आहे तर दुस-या गटात अशा लोकांना सहभागी करून घेण्यात आले की, ज्यांनी फेसबुकचा वापर बंद केला आहे. इन्स्टिट्यूटचे चीफ एक्झिक्युटिव्ह एम. वाइकिंगने म्हटले आहे की, आम्ही फेसबुकवर यासाठी फोकस केले याचे कारण असे की, सर्व वयोगटांतील लोक या साईटचा सर्वांत जास्त वापर करतात. ज्या लोकांनी फेसबुकचा वापर बंद केला त्यांपैकी ८८ टक्के लोकांनी आठवड्यांनंतर सांगितले की, आम्ही आमच्या जीवनात बेहद्द खुश आहोत. या तुलनेत दुस-या गटातील ८१ टक्के लोकांनी खुश नसल्याचे नमूद केले. पहिल्या गटातील जवळपास ८४ टक्के लोकांनी म्हटले की, त्यांचे जीवन आनंदी झाले आहे तर दुस-या गटात असे मानणा-या लोकांची टक्केवारी ७५ टक्के आहे. दुस-या गटातील लोकांनी खुश नसल्याचे नमूद केले. लोकांचे जीवन आनंदी झाले आहे.

आनंदी जीवनाचा फॉम्र्युला या प्रयोगाच्या शेवटी असा निष्कर्ष निघाला की, फेसबुकचा वापर करणारे लोक सामाजिक जीवनात आनंदी आहेत. त्यांना लक्ष्य केंद्रित करण्यासाठी कमी अडचणींना सामोरे जावे लागले. त्या तुलनेत दुस-या गटातील लोकांच्या सामाजिक जीवनात कोणताही बदल झाल्याचे दिसून आले. अभ्यास करणा-या पथकाच्या म्हणण्यानुसार आमची आवश्यकता काय आहे हे लक्षात घेता आम्ही दुस-याकडे काय आहे याकडे लक्ष देत आहोत. त्यामुळे अडचणी उभ्या राहतात. अभ्यासाद्वारे या निष्कर्षांपर्यंत पोहोचता येते की, फेसबुक वापरणा-यांच्या तुलनेत फेसबुकचा कमी वापर करणारे ३९ टक्के लोक आनंदी आहेत.

Leave a Comment