
बीजिंग : ‘सुपरफोन’ची निर्मिती करण्याची घोषणा चीनची ‘हुवेई’ या मोबाईल निर्माता कंपनीने केली आहे. या सुपरफोनकडे ‘नेक्स्ट जनरेशन फोन’ म्हणून पाहिले जात आहे. २०२० मध्ये हा फोन लॉन्च होऊ शकतो. मोबाईलचा वापर आणि मोबाईलकडे पाहण्याचा संपूर्ण दृष्टीकोनच हा सुपरफोन बदलून टाकेन, असा विश्वास कंपनीला वाटत आहे.
आता ‘हुवेई’ आणणार ‘सुपरफोन’!
या ‘सुपरफोन’मध्ये भौतिक आणि डिजिटल जग एकाच ठिकाणी आणण्याची शक्ती असल्याचा दावा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. ‘हुवेई’ने आपल्या या महत्त्वकांक्षी प्रोजेक्टसाठी फोल्कवॅगन, मर्सिडिज बेंझ, ऑडी यांसारख्या ऑटोमोबाईल ब्रॅन्डसोबतही हातमिळवणी केली आहे.
