मराठमोळ्या अजिंक्यला अ‍ॅपलने दिली २ कोटींची ऑफर

apple
नाशिक : एका २० वर्षीय मराठमोळ्या तरुणाचे यश सर्वांनाच आनंददायी धक्का देऊ शकते. या तरुण विद्यार्थ्याचे नाव अजिंक्य शिवाजी लोहकरे असे असून मुळचा अहमदनगरच्या कोपरगावात राहणारा आहे. अवघ्या २० वर्षांचा अजिंक्य सध्या नाशिकच्या भुजबळ नॉलेज सिटी कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. अजिंक्यचे वडील चप्पलचे दुकान चालवतात. अ‍ॅपल या नामांकित कंपनीने कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या दुस-या वर्षाला शिकणा-या अजिंक्यला तब्बल २ कोटी रुपये वार्षिक पगार देऊन कंपनीत रुजू होण्याची ऑफर दिली आहे.

घरामध्ये कॉम्प्युटरही नसलेल्या अजिंक्यला कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर सॉफ्टवेअर आणि अ‍ॅप्लिकेशन्सने वेडच लावले. याच वेडात अजिंक्यने एजेबुक नावाचे एक सॉफ्टवेअर तयार केले आहे. या अ‍ॅप्लिकेशनची माहिती कंपन्यांपर्यंत पोहचल्यानंतर कंपन्यांनाही या अ‍ॅप्लिकेशने वेड लावले.

एजेबुकमध्ये २ जीबीपर्यंत डेटा शेअरिंग करता येऊ शकतो. शिवाय यासाठी तुम्हाला इंटरनेटचीही गरज नाही. साडेतीन किलोमीटरच्या अंतरात असणा-या दोन डिव्हाईसला एजेबुकच्या सहाय्याने कनेक्ट करता येऊ शकते. फेसबुक, व्हॉटसअपलाही मागे टाकण्याची क्षमता असणा-या या अ‍ॅप्लिकेशनचे महत्व लक्षात घेत अनेक कंपन्यांनी अजिंक्यला आकर्षक ऑफर दिल्या आहेत.

याअगोदर अजिंक्यला इन्फोसिसकडून देखील नोकरीची ऑफर मिळाली होती. यासाठी त्याला ऑस्टड्ढेलियाला पाठवण्यात येणार होते. शिवाय फेसबुककडूनही त्याला १ कोटी ६७ लाख रुपयांची ऑफर मिळाली होती. पण, या कंपन्यांना मागे टाकत अ‍ॅपलने अजिंक्यला तब्बल २ कोटी रुपयांसहीत इतर सवलती देऊ केल्या. शिवाय हा जॉब करण्यासाठी अजिंक्यला देशाबाहेरही जाण्याची गरज नाही. लवकरच तो अ‍ॅपलच्या पुण्यातल्या ऑफिसमध्ये जॉईन होणार आहे. शिवाय, इथे राहून त्याला आपले अर्धवट शिक्षणही पूर्ण करता येणार आहे.

Leave a Comment