धनत्रयोदशीच्या दिवशी निर्देशांक ४८१ ने उतरला

share-marketr
मुंबई – भारतीय जनता पक्षाच्या बिहारमधील पराभवाचा परिणाम शेअर बाजारावर झाल्याचे दिसत असून ४८१ अंकांनी निर्देशांकाने सकाळीच बाजार सुरू होताच आपटी खाल्ली.

आज दिवाळीचा मुहूर्त. शेअर बाजारात आज तेजीच्या वातावरणाची अपेक्षा असते. मात्र निर्देशांक खाली-खालीच जाताना दिसला. आर्थिक क्षेत्रातील माध्यमांनी कालच याचा अंदाज व्यक्त केला होता. तोच आज स्पष्टपणे निर्देशांकात परिवर्तित झाल्याचे दिसत आहे. दिवसभरात मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारात पडझडच पाहायला मिळेल असेच यावरुन दिसत आहे. निफ्टीही १४२ अंशांनी खाली गेला आहे. निफ्टीचा निर्देशांक ७७७१ वर तर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक २५६५६ वर आला आहे.

Leave a Comment