
नवी दिल्ली- सॅमसंगने मोबाईलच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी ऑन सिरिजमधले आणखी दोन नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च केले असून सामान्यांना परवडणारी या स्मार्टफोनची किंमत असणार आहे.
सॅमसंगने आणले ऑन सिरिजचे दोन स्मार्टफोन
भारतात ‘सॅमसंग गॅलेक्सी ऑन ५’ आणि ‘सॅमसंग गॅलेक्सी ऑन ७’ असे दोन बजेट स्मार्टफोन लॉन्च करण्यात आले आहेत. हे स्मार्टफोन मंगळवार मध्यरात्रीपासून ऑनलाईन शॉपिंग साईट फ्लिपकार्टवर उपलब्ध करण्यात येणार असून गोल्ड आणि काळ्या रंगामध्ये हे स्मार्टफोन उपलब्ध आहे.
‘सॅमसंग गॅलेक्सी ऑन ५’ चे फिचर्स – » पाच इंच डिस्प्ले » आठ जीबी इंटरनल मेमरी » १.२ गीगाह्ट्स ऑक्टोकोर प्रोसेसर » एक जीबी रॅम » ७२०X१२८० पिक्सल स्क्रिन रेझ्योल्यूशन » आठ मेगापिक्सेल रेअर कॅमेरा » पाच मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा » ५.१.१. अँड्रोईड लॉलीपॉप » २६०० एमएएच बॅटरी » किंमत – आठ हजार ९९० रुपये
‘सॅमसंग गॅलेक्सी ऑन ७’ चे फिचर्स » ५.५ इंच डिस्प्ले » आठ जीबी इंटरनल मेमरी » १.२ गीगाह्ट्स ऑक्टोकोर प्रोसेसर » १.५ जीबी रॅम » ७२०X१२८० पिक्सल स्क्रिन रेझ्योल्यूशन » १३ मेगापिक्सेल रेअर कॅमेरा » पाच मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा » ५.१.१. अँड्रोईड लॉलीपॉप » ३००० एमएएच बॅटरी » किंमत – १० हजार ९९० रुपये
